शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला 50 वर्षे होत असून, या धरणाची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आली नसल्याने पाण्याचा अपेक्षित साठा होत नाही. गेल्या 10 वर्षापासून शेतकरी धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत.         मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत  आहे. खापरखेडा धरणाच्या पाण्यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी क्षमता होती. या धरणामुळे कोंढावळ, जयनगर, बोराळे, वडाळी या गावातील शेतक:यांच्या शेतीला फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या 50 वर्षापासून धरणातील गाळदेखील काढण्यात आलेला नाही.  त्यामुळे धरणातील पाणी क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.  सद्य:स्थितीत 100 हेक्टर जमिनीलाही त्याचा उपयोग होत नाही. महागडी बियाणे पेरुन शेतकरी आहे त्या परिस्थितीत पिके जगविण्याचा प्रय} करतात. परंतु या पिकांना शेवटचे पाणी मिळत नसल्याने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे शेतक:यांनी सांगितले. या सर्व प्रकारास पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून धरणातील गाळ व दुरूस्तीच्या कामाची माहिती घेतली असता  लाखो रुपयांची बिले पास         झाल्याचे समजते. मात्र धरणाचे कोणत्याही प्रकारे दुरूस्तीचे काम केल्याचे दिसून येत नाही. धरणात पाणी कमी व गाळ अधिक           साचला आहे. धरणाचे मेनगेट 10 वर्षापासून नादुरुस्त असल्याने त्याद्वारे पाणी पास होत नाही. त्याठिकाणी मोठा बोगदा पडला असून या बोगद्याद्वारे पावसाचे पाणी वाहून जाते. धरणाचा काही भाग खचला असल्याने  त्याद्वारेही पाणी वाहून जाते. धरणाच्या बांधावर काटेरी झुडपे प्रचंड प्रमाणात वाढले असून दगडी पिचींगही उखडली आहे. डिसेंबर 2018 मध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी खापरखेडा व कोंढावळ धरणाची पाहणी केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तरी या धरणातील गाळ काढण्यासह दुरूस्तीचे काम होण्याची अपेक्षा आहे. मात्र संबंधित पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी करून बिले काढत असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे.दरम्यान, या परिसरात दोन नद्या व लहान नाले असून, या नदी-नाल्यानंवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. परंतु तेही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने याठिकाणी शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.