शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

खंडोजी महाराजांचा रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : 130 वर्षाची परंपरा लाभलेल्या संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : 130 वर्षाची परंपरा लाभलेल्या संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संत खंडोजी महाराज व जय श्रीरामाच्या जयघोषाने तळोदा नगरी दुमदुमली होती. दरम्यान, पंचक्रोशीतून भाविकांनी दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावल्याने शहरात यात्रेचे स्वरूप आले होते. यामुळे बाजारपेठही गजबजली होती.तळोद्यात कोजागिरी पौर्णिमेस कुकरमुंडा येथील संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव साजरा करण्यात येत असतो. 130 वर्षाची परंपरा लाभलेल्या रथोत्सव यंदाही साजरा करण्यासाठी येथील रथोत्सव समितीने जय्यत तयारी केली होती. रविवारी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेल्या रथाची मिरवणूक शहरातील मुरलीधर मंदिरापासून करण्यात आली. तत्पूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते रथाची पूजा करून आरती करण्यात आली. या वेळी रथोत्सव समितीचे सुधीर वाणी, अॅड.संजय पुराणिक, नरेंद्र ओझा, प्रसाद बैकर, सुनील दीक्षित, हरीष जोशी, मधुकर मिस्तरी आदी उपस्थित होते. रथाची पूजा व आरती झाल्यानंतर औपचारीकपणे भाविकांनी आपल्या हातांनी रथ  ओढत तेथून हलविला. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथाची         मिरवणूक काढण्यात आली. मेनरोड, स्मारक चौक, कचेरी रोड तेथून पुन्हा बाजार पेठ मार्गे हातोडा नाक्याजवळ विसजर्न करण्यात आले. या वेळी सुवासिनींनी रथाची आरती केली होती. भाविकांनी संत खंडोजी महाराज व जयश्रीरामांचा जयघोष केल्याने संपूर्ण तळोदा नगरी दुमदुमली होती. रथोत्सवास तळोदा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. साहजिकच शहरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रथास मुख्यता भाविकांकडून केळीचा प्रसाद चढविण्यात येत असल्यामुळे केळीचा महागडा भाव असतांना प्रंच मागणी झाली होती. याशिवाय इतर व्यावसायिकांनीदेखील हजेरी लावल्यामुळे शहराची बाजारपेठही गजबजली होती. रथोत्सव साजरा करण्यासाठी समितीच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले होते. तसेच येथील वीज वितरण कंपनीने रथाच्या मार्गावरील वीजपुरवठा मिरवणूक दरम्यान बंद केला होता. शिवाय कर्मचारी जातीने उपस्थित होते. पोलिसांनीदेखील रथोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर अतिरिक्त बंदोबस्त मागविला होता. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, फौजदार सोनवणे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शहरात साजरा होणारा संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव पूर्वी भाविकच ओढत होते. त्या मागे मोठी श्रद्धा होती. तथापि काल बदलत गेल्यानंतर काळाच्या ओघात परंपराही बदलली. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षापासून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथ ओढण्यास सुरूवात करण्यात आली. साहजिकच भाविकांची रथ ओढण्याची प्रथा खंडीत झाली. असे असले तरी खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाचे आकर्षण भाविकांना आजही आहे. त्यामुळे यंदाही भाविकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.