शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात कालिकामातेच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:57 IST

कल्पेश नुक्ते । लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा- साधारण 100  वर्षांची परंपरा लाभालेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सवाला यंदाही मोठय़ा थाटात सुरूवात झाली़ माघ शुद्ध पौर्णिमा निमित्त बुधवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीत यात्रोत्सवाला प्रारंभ झाला़ सकाळी नवस फेडणा:यांसह देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी महिलांची रिघ लागली होती़ दुर्गम व अतीदुर्गम भागासह गुजरात राज्यातून भाविकांची हजेरी ...

कल्पेश नुक्ते । लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा- साधारण 100  वर्षांची परंपरा लाभालेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सवाला यंदाही मोठय़ा थाटात सुरूवात झाली़ माघ शुद्ध पौर्णिमा निमित्त बुधवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीत यात्रोत्सवाला प्रारंभ झाला़ सकाळी नवस फेडणा:यांसह देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी महिलांची रिघ लागली होती़ दुर्गम व अतीदुर्गम भागासह गुजरात राज्यातून भाविकांची हजेरी लागत असल्याने गेल्या चार दिवसांपूर्वीपासून  व्यापा:यांनी व्यवसाय थाटण्यास सुरूवात केली होती़ यात्रोत्सवात सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणा:या सुप्रसिद्ध बैलबाजारात यंदाही बैलांची आवक होण्यास प्रारंभ झाला असून सायंकाळर्पयत 700 बैलांची आवक झाल्याचे सांगण्यात आल़े प्रत्यक्ष व्यवहारांना गुरुवारी सकाळपासून सुरूवात होणार आह़े मनोरंजनाची साधने, खेळणी, खाद्यपदार्थ, मसाले, गृहपयोगी साधने, कपडे, चांदीचे दागिने यासोबतच याठिकाणी विविध शेतीची औजारे विक्रेतेही उपस्थित होत़ेजीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली, पंचायत समितीचे माजी सभापती आमश्या पाडवी, नवरतन जैन, माजी उपसरपंच विश्वासराव मराठे, मनोज डागा, तुकाराम लोहार, भाऊ राणा, राजू कोटला, विजय सोनार, भिकमचंद चौहान, पृथ्वीसिंग पाडवी यांच्या सहभागाने हे कार्य पूर्ण झाले होत़े 2007 साली विजय नारायण सोनार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि पुढे 2009 साली माजी आमदार डॉ नरेंद्र पाडवी यांच्या नेतृत्वात नवीन 23 विश्वस्तांची कमिटी बनविण्यात आली.यात्रोत्सवानिमित्त यंदाही जामली, खटवाणी, काकरपाडा व गंगापूर आदी गावांकडून पौर्णिमेला तगतरावांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली आहे. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तगतरावांचे रथ तयार करून सवाद्य मिघालेल्या मिरवणूकांमध्ये ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े गावाच्या विविध मार्गावरून तगतरावांची शोभायात्रा काढण्यात आली होती़ यानंतर कालिका माता मंदिराच्या 5 प्रदक्षिणा पूर्ण  करून रथ यात्रेत फिरवून पुन्हा गावाकडे परत गेल़े देवीच्या यात्रोत्सवानिमित्त प्रथम पूजेचा मान हा काठी संस्थानिकांना दिला जातो़ यंदाही ही परंपरा पाळली गेली आह़े यात्रोत्सवात सातपुडय़ाच्या दुर्गम अतीदुर्गम भागासह विविध भागातील आदिवासी बांधव आणि नागरिकांची हजेरी लागत असल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े