शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

कभी लगते थे यहाँ मेले, आज थंडे पडे है चुल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव/मोलगी/वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या अर्थचक्राला वेग देणाऱ्या आमचूर उद्योगाला यंदा घरघर लागली आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव/मोलगी/वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या अर्थचक्राला वेग देणाऱ्या आमचूर उद्योगाला यंदा घरघर लागली आहे़ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान सतत झालेला अवकाळी पाऊस, गारठा आणि त्यानंतरचे वातावरणीय बदल यामुळे झाडांवर आंबेच न आल्याने यंदा हा उद्योग फूलू शकलेला नाही़ परिणामी अनेकांच्या घरांच्या चुली थंड पडल्या असून संपूर्ण वर्ष याचा परिणाम दिसून येणार आहे़गाव, पाडा व घर तेथे महू आणि आंब्याची झाडे ही सातपुड्याची ओळख आहे़ निसर्गादत्त असलेल्या या झाडांच्या साथीने जगणाºया आदिवासी बांधवांनी यातून रोजगार संधी उपलब्ध करुन घेतल्या आहेत़ गेल्या काही वर्षात सातपुड्यात लागवड करण्यात आलेल्या शेकडो आंब्यांच्या झाडांसोबत वनांमध्ये नैसर्गिकरित्या बहरलेल्या आम्रवृक्षांतून येणाºया कैºया आणि आंबे यांची विक्री करण्याचा उपक्रम सुरु आहे़ यातही कच्च्या कैरीपासून तयार होणाºया आमचूरला सर्वाधिक महत्त्व आले आहे़ मोलगी, धडगाव या दोन ठिकाणी बाजारपेठ निर्माण झाल्याने परराज्यातून येणारे व्यापारी उन्हाळ्यात हा माल खरेदी करुन घेऊन जात होते़ यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यात घराघरो आमचूर तयार करण्यास वेग येत होता़ यंदा मात्र या उलट चित्र आहे़ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी पडलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतरचा गारठा यामुळे आंबा झाडांवर आलेल्या मोहोरवर परिणाम झाला आहे़ यात नव्याने येणाºया मोहोरला प्रामुख्याने उष्णताच न मिळाल्याने नुकसान वाढले होते़ ज्या झाडांवर मोहोर आला होता तोही वेळोवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसात गळून गेला़ यातून यंदाच्या हंगामात सातपुड्यात पाच टक्केही आंबा उत्पादन आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे़सातपुड्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील असंख्य झाडे आंब्याविनाच आहेत़ थोड्याफार प्रमाणात आलेले आंबे आमसूल तयार करण्यायोग्य नसल्याने दुर्गम भागातील आमचूर उद्योग पूर्णपणे थांबला आहे़ परिणामी केवळ आदिवासी बांधवच नव्हे तर आमचूर खरेदी करुन त्याची देशभर निर्यात करणारे व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारे मजूर यांचे नुकसान झाले आहे़ यामुळे स्थलांतर करुन परतलेल्या शेकडो मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे़तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने इतर रोजगार बुडाले आहेत़ लॉकडाऊनमध्ये शासनाकडून धान्य किंवा इतर बाबींचा पुरवठा करण्यात येत असला तरी दैनंदिन व्यवहारांसाठी पैसाच उपलब्ध नसल्याची माहिती आहे़ मोलगी, धडगाव, खुंटामोडी, पिंपळखुटा यासह जागोजागी लागणारे आमचूर मोजणारे वजन काटेही नसल्याने दुर्गम भागातील चैतन्य हरवल्याचे जाणवत आहे़ स्थलांतरीत झालेले परत येत असल्याने त्यांना आमचूरमधून मिळणारा रोजगार नसल्याने चिंता वाढल्या आहेत़

४सावर ता़ तळोदा येथील अशोक वसावे यांच्यासोबत याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या कुटूंबातील आबालवृद्ध तसेच नातेवाईकही या कामात चार महिने मदत करत होते़ यातून सर्वांनाच रोजगार मिळत होता़ शेतात, परसबागेतील आंबा झाडांसोबत नातलगांकडून भाडोत्री पद्धतीने आंबा झाडे घेऊन हा व्यवसाय फुलवत होता़ परंतू यंदा एका रुपयाचेही उत्पादन न आल्याने अडचणी वाढल्या आहेत़ किरकोळ स्वरुपातही आंबे नाहीत़ शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून सातपुड्याच्या दऱ्याखोºयातील आमचूर व आंबा उत्पादकांना मदत करण्याची गरज आहे़अशोक वसावे यांच्या कुटूंबाप्रमाणेच तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्याच्या विविध भागातील कुटूंबांची सध्या अशीच गत आहे़ हाती काहीच नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

गेल्या वर्षी आमचूरचे दर हे प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेले होते़ १०० ते २०० रुपये प्रतिकिलो या दराने हे आमचूर खरेदी करण्यात येत होती़ तीन वर्गवारीनुसार आमचूरची खरेदी व्यापारी करत होते़ यंदा या दरांमध्ये वाढ होण्याचे संकेत होते़ परंतू हंगामच नसल्याने कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळालेला नाही़ चार महिने चालणाऱ्या या व्यवसायातून एका कुटंूबाला किमान ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळत होती़ साधारण १० क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक आमसूलाची निर्मिती संपूर्ण कुटंूब करत होते़ यातून वार्षिक उत्सव, घरात मृत्यू झालेल्यांचे उत्तरकार्य, विवाह सोहळे यासोबत इतर घरगुती कार्यक्रम केले जात होते़ रोजगारच न मिळाल्याने या सर्व उपक्रमांना यंदा ब्रेक लागला असल्याची माहिती देण्यात येत आहे़

धडगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कैऱ्यांपासून आमचूर तयार करण्याच्या उद्योगासोबत गावठी आंबा विक्रीचाही व्यवसाय तेजीत होता़ सेंद्रीय पद्धतीने नैसर्गिक आंबा त्याच पद्धतीने पिकवून त्याची विक्री केली जात होती़ गुजरातसह नंदुरबार जिल्ह्याच्या शहरी भागात लोकप्रिय असलेला आंबा यंदा मिळत नसल्याने खवय्यांची निराशा झाली आहे़ धडगाव तालुक्याच्या विविध भागात गावठी सोबतच केशर आणि कलमी आंब्यांच्या बागा आहेत़ या बांगाही ओस पडल्या आहेत़ सोबत घरोघरी आमचूर बनवण्याचे काम नसल्याने घरे बंदीस्त होऊन शुकशुकाट पसरला आहे़