शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लोणखेड्यात सराफा दुकान फोडून लाखोंच्या दागीण्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:27 IST

मंदाणे : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील चार रस्त्यावरील रामदेवजी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाच्या शटरचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडून दीड ...

मंदाणे : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील चार रस्त्यावरील रामदेवजी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाच्या शटरचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अत्यंत रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, लोणखेडा चार रस्त्यावरील फ्रेंड प्लाझा या इमारतीत पंकज सुरजमल जैन यांचे रामदेवजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान गेल्या तीन वर्षापासून थाटले आहे. या दुकानात ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक तोडून प्रवेश करीत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी दुकानाचे शटर तुटल्याचे निदर्शनास आल्यावर दुकान मालक पंकज जैन यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानात मालाची चौकशी केली असता मोठी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलीसांना घटनेची माहिती दिली. या वेळी पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, सहायक पोलीस निरीक्षक बापू शिंदे हे सहकाऱ्यांसह घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र नेमका चोरट्याचा माग काढता आला नाही. चोरटे हे चारचाकी वाहनाने आले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या १७० कर्ण फुले व नाक फुल्या, आठ हजार ८०० रुपये किमतीच्या २० ग्रॅम चांदीच्या आठ बांगड्या, २८ हजार रुपये किमतीचे ७०० ग्रॅम, चांदीचे सात कंबर पट्टा, १४ हजार ८०० रुपये किमतीचे ३७० ग्रॅम वजनाचे चांदीचे आरती व दिवा, १४ हजार रुपये किमतीचे ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे आठ ग्लास, असा एकूण एक लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.या धाडसी चोरी प्रकरणी रामदेवजी ज्वेलर्सचे मालक पंकज सुरजमल जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. प्रिदर्शनी थोरात करीत आहे.