लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरानजीक घोडजामणे शिवारातुन वनविभागाच्या पथकाने लाकुड व सुतार कामासाठी वापरात येणारे यंत्र मिळुन एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे व वन कर्मचारी यांनी शहरानजीकच्या घोडजामणे शिवारात पिन्या होत्या गावीत यांच्या घरा जवळच्या पडसाळीत शोध परवान्याचा वापर करुन झडती घेतली होती़ झडती दरम्यान अवैध रित्या ठेवलेले ताज्या तोडीचे ४५ नग साग लाकुड, रंधा मशिन, विद्युत मोटर तथा सुथार साहित्य आढळून आला़ पंचनामा करुन एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन शासकीय वाहनाने नवापूर येथील काष्ठ आगारात जमा करण्यात आला. घटना स्थळी संशयित आरोपी मिळुन आला नसल्याची माहिती वनविभागाने दिली आहे़ वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी गुन्हा नोंदवला आहे़ उपवनसंरक्षक वनविभाग शहादा, दक्षता वनविभागीय अधिकारी धुळे व सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डीक़े जाधव, वनरक्षक सतिष पदमोर, प्रशांत सोनवणे, कमलेश वसावे, लक्ष्मण पवार यांनी ही कारवाई केली़ पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहे.
नवापूर जवळ साग लाकडासह मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:59 IST