लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेतकरी व शेतमजुरांचे हित जोपासण्यासाठी स्व.पी.के. अण्णांनी सातपुडा साखर कारखान्याची मुहूर्तमेढ केली होती. सातपुडा कारखान्याने पन्नाशी गाठली असून ज्या उद्देशाने या कारखान्याची स्थापना झाली तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आजवरची वाटचाल सुरू असून भविष्यातही परिसरातील विकासाचे हे केंद्र अधिक भक्कम करण्यासाठी आपले प्रय} राहील. त्यासाठी सर्वानी साथ द्यावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले.सातपुडा साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सभा चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कारखाना साईटवर झालेल्या या सभेला कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, उद्योगपती सरकार रावल, हिरालाल चौधरी, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पं.स.चे माजी सभापती दरबारसिंग गिरासे, डॉ.सुभाष फुलंब्रीकर, अॅड.हुसेनी शाहेद, हैदरअली नुरानी, माधव पाटील, प्रा.मकरंद पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, के.डी. पाटील, विजय विठ्ठल पाटील, सुभाष शंकर पाटील, सुनील काशीनाथ पाटील, कांचन पाटील, पुरुषोत्तमनगरच्या सरपंच ज्योती पाटील, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील व कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.दीपक पाटील पुढे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्व.पी.के. अण्णांनी सातपुडय़ाची उभारणी केली. शेतकरी-शेतमजूर सुखी व्हावेत, आर्थिक सुबत्ता यावी म्हणून सातपुडा कारखाना उभा केला. शिक्षणाची गरज ओळखून शिक्षणाची विविध दालने सुरू केली. आज देश-विदेशात मोठय़ा पदांवर व्यवसायात आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी भेटतात तेव्हा मनस्वी आनंद होतो. अनेक अडीअडचणींचा सामना करीत आज सातपुडय़ाने पन्नाशी गाठली आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. माजी संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यानेच हे साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अजित पवार आदी राजकारणातील ज्येष्ठांनी आणि सहकार भारतीने सातपुडा कारखान्याला अडचणीच्या काळात मोठी मदत केल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले. सातपुडा साखर कारखाना आपल्या हक्काचा कारखाना आहे. आपण या कारखान्याचे मालक आहात, कारखाना चालला तरच आपली किंमत असल्याने सर्वानी एकजुटीने कारखाना चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन दीपक पाटील यांनी केले.प्रास्ताविक पी.आर. पाटील यांनी केले. सभेला विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
सातपुडा साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सभेचे औचित्य साधून माजी संचालक, अधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थापक संचालकांपैकी रोहिदास पाटील (पिंपळोद) हे एकमेव संचालक उपस्थित होते.उद्योजक हिरालाल चौधरी (नंदुरबार) यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा दीपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सातपुडा शेतकरी’ अॅपचा शुभारंभ करण्यात आला. या अॅपवर शेतक:यांना ऊस नोंदणी झाल्यापासून ते पेमेंट अदा करण्यार्पयतची सर्व माहिती मिळणार आहे.सर्वाधिक ऊस उत्पादन घेणा:या शेतकरी सभासदांचा विशेष सन्मान करण्यात आला.