लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात शहर शांतता समिती सदस्यांची बैठक शहादा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. येत्या आठवडय़ात श्रीराम जन्मभूमीचा निकाल तसेच दोन दिवसापूर्वी ईद-ए-मिलाद या दोन मोठय़ा घडामोडींमुळे शहर व परिसराची कायदा आणि सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी याकरिता बैठक घेण्यात आली.या वेळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतिलाल टाटिया, जामा मशिदीचे मौलाना कादरी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी शहादा प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी म्हटले की, येणा:या आठवडय़ात श्री राम जन्मभूमी-बाबरी मशीद यांचा निकाल जाहीर होणार असून, निर्णय कुठल्याही बाजूने लागो निर्णयाच्या विरोधात कोणताही व्यक्ती जाणार नाही, असे आव्हान करीत प्रशासन या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. शहर परिसर आपलं आहे. शांततेला गालबोट लागू नये याकरिता शांतता समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकत्र्यानी याची दक्षता घ्यावी. तसेच 10 नोव्हेंबर रोजी मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद उत्सव साजरा होणार आहे. हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहाने व शांततेत साजरा करण्याचेदेखील आव्हान करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठवून ते त्वरित फॉरवर्ड करू नये. सध्या सर्वच भ्रमणध्वनी हे सायबर सेलच्या अंतर्गत आलेले असून, चुकीचा मेसेज फॉरवर्ड करणा:यां विरूद्ध पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची ग्वाही शांतता समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ.पाटिया, प्रा.लियाकत अली सय्यद नूह नूरानी, नगरसेवक वसीम तेली, माजी नगरसेवक के.डी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, इरफान पठाण, समीर जैन, नगरसेवक संजय साठे, आरिफ पिंजारी, संदीप पाटील, नंदुरबार जिल्हा शिवसेना माजी प्रमुख अरुण चौधरी, भाजपाचे दिनेश खंडेलवाल, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सरसंघचालक डॉ.हेमंत सोनी, ललित छाजेड, प्राचार्य खलील शहा यांच्यासह शहरातील हिंदू-मुस्लीम समाजातील शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील तर आभार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.
कायदा हातात घेतल्यास गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:35 IST