शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोळदा ते सेंधवा दरम्यान वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत असताना एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून होणा:या ऊस वाहतुकीमुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे उसाची अशाप्रकारे वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करून अशी वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत असताना एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून होणा:या ऊस वाहतुकीमुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे उसाची अशाप्रकारे वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करून अशी वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी हे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे साईडपट्टय़ांचे खोदकाम, फरशी पुलासाठी केलेले खड्डे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. प्रकाशा ते लांबोळा दरम्यान रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यातच ऑस्टोरिया व सातपुडा साखर कारखान्यात ऊस वाहतुकीसाठी एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करण्यात येत आहे. दोन ट्रॉलीमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होते. या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना इतर वाहन चालकांना दोन ट्रॉलींचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेळ व पैशांच्या बचतीसाठी मुकादमांकडून हा प्रकार होत असला तरी इतर वाहनधारकांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणा:या काही बैलगाडी व ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने ही वाहने दिसत नाही. त्यामुळे रिफ्लेक्टर नसलेल्या व दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.