अपुऱ्या साधन सामुग्रीवर दिला जातोय लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:00 PM2020-03-24T12:00:35+5:302020-03-24T12:00:50+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन राज्यांच्या सिमा असलेला, पश्चिम रेल्वेचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक, तीन महामार्ग गेलेला ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन राज्यांच्या सिमा असलेला, पश्चिम रेल्वेचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक, तीन महामार्ग गेलेला जिल्हा यामुळे जिल्ह्यात ‘कोरोना’चा मोठा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. आधीच सोयी व साधनांची कमतरता असतांना त्यावर मात करीत प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आवश्यक त्या सर्व बाबी पडताळून पाहिल्या जात असून आता नागरिकांनी स्वत: काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्हा दोन राज्यांच्या सिमेवरील जिल्हा आहे. अनेक गावे दोन्ही राज्यांच्या अंतर्गत भागात असल्याने दैनंदिन व्यवहार करतांना नागरिकांना दोन्ही राज्यातील गावांमधून ये-जा करावी लागते. अशीच स्थिती प्रवासी वाहतुकीची देखील आहे. रेल्वे आणि बस वाहतुकीसह खाजगी वाहतुक करतांना देखील मोठी रिस्क आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
अपुºया साधनसामुग्रीवर कसरत
जिल्हा प्रशासनाकडे पुरेशी वैद्यकीय सामुग्री उपलब्ध नाही. आहे त्या साधनांवर योग्य प्रकारे नियोजन करून सेवा दिली जात आहे. यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे सर्व यंत्रणेवर मॉनिटरींग करीत आहे. आजच्या स्थितीत जिल्हा रुग्णालयात केवळ ३९ आयसीयूचे बेड आहेत. नंदुरबार, शहादा येथील खाजगी डॉक्टरांकडील आयसीयू बेडची संख्या ही ५४ आहे. असे एकुण केवळ ९३ आयसीयू बेड जिल्हाभरात उपलब्ध आहे. साथीचा फैलाव झालाच तर मोठी कसरत ठरणार आहे. अशीच स्थिती व्हेंटीलेटरची देखील आहे. शासकीय रुग्णालयातील पाच आणि खाजगी रुग्णालयातील १४ असे केवळ १९ व्हेंटीलेटर जिल्हाभरात उपलब्ध आहेत. थर्मल स्कॅनर केवळ सहा उपलब्ध आहेत. आणखी २० स्कॅनरची मागणी करण्यात आली आहे. आज, उद्यामध्ये ते उपलब्ध होतील. व्हेंलिटरची मागणी देखील करण्यात आली असून सुरत येथून ते खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तालुकास्तरावर
विलगीकरण कक्ष
एकाच वेळी २०० पेक्षा अधीक पेशंट आल्यास त्यांची व्यवस्था व्हावी, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जावे यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये व्यवस्था नाही. परिणामी विद्यार्थी होस्टेलचा पर्याय निवडण्यात आला आहे. यात पॉलिटेक्निक कॉलेज नंदुरबारमधील ३० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीगृह नवापूर येथे ४० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलींचे वस्तीगृह नवापूर ३० खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह शहादा ८० खोल्या, आदिवासी मुलींचे वस्तीगृह खापर २४ खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह आमलाड ता.तळोदा ४० खोल्या आणि आदिवासी मुलांचे वस्तीगृह मांडवी बु. ता.अक्राणी येथील ३० खोल्यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
सहा ठिकाणी पथके तैणात
जिल्हा आणि राज्याच्या सिमेवर सहा ठिकाणी पथके तैणात करण्यात आली आहेत. परराज्यातून जिल्ह्यात येणाºया प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. यासाठी गुजरात राज्याच्या सिमेवर वाका चार रस्ता व बेडकी, ता.नवापूर व गव्हाळी, ता.अक्कलकुवा येथे पथक आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर रायखेड, ता.शहादा येथे पथक कार्यान्वीत आहे. याशिवाय इतर दोन ठिकाणी पथके उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे व बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकातील आरोग्य पथके काढून घेण्यात आली आहेत.
इतर सुविधा
४थर्मल स्कॅनर : ६, प्रस्तावीत : २०
४आयसीयू बेड-
शासकीय : ३९, खाजगी : ५३
४व्हेंटीलेटर-
शासकीय : १४, खाजगी : १९
तयार केलेले विलगीकरण कक्ष
पॉलिटेक्नीक कॉलेज, नंदुरबार
वरिष्ठ महा.वसतीगृह, नवापूर
मुलींचे वसतिगृह, नवापूर
मुलांचे वसतिगृह, शहादा
मुलींचे वसतिगृह, खापर
मुलांचे वसतिगृह, आमलाड-तळोदा
मुलांचे वसतिगृह, मांडवी, अक्राणी
सध्य स्थितीत जिल्हा रुग्णालयात ३२ बेडचे विलगीकरण कक्ष सुरू.