लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सवसाठी गुजरात व मध्यप्रदेशील भाविकांना श्रींची मूर्ती पुरविणा:या नंदुरबार शहरात नवरात्रोत्सवसाठी दुर्गा मातेची भाविकांना अपेक्षित मूर्ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे नंदुरबारमधील सार्वजनिक युवक मंडळाने बु:हाणपूर येथून दुर्गा मातेची नऊ फुटी मूर्ती आणली आहे. परदेशीपुरा नंदुरबार येथील सार्वजनिक युवक मंडळामार्फत 38 वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या मंडळाच्या कार्यकत्र्याना अपेक्षीत देवीची मूर्ती नंदुरबारात उपलब्ध होत नसलयाने त्यांनी थेट मध्यप्रदेशातील बु:हाणपूर गाठले. 21 हजार रुपये खर्च करुन त्यांनी नऊ फुटी मूर्ती आणली. या माध्यमातून देवीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती नंदुरबार शहरातील भाविकांसाठी आकर्षणाची ठरत आहे. या मंडळामार्फत नवरात्रोत्सव कालावधीत गरब्याचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अखेरच्या दोन दिवसात सुंदरकांड व भंडारा हे कार्यक्रम होणार असून दस:याच्या पूर्वसंध्येलाही कार्यक्रम होणार असल्याचे मंडळाच्या पदाधिका:यांनी सांगितले. यासाठी मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश पाटील, उपाध्यक्ष दशरथ शिंदे, सचिव खुशवंत परदेशी, गौतम भिल, रोहित कोळी यांनी परिश्रम घेतले.
नऊ फुटी मूर्तीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:36 IST