शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसदस्यीय समितीची सलसाडी आश्रमशाळा येथे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत नाशिक येथील आदिवासी आयुक्तांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने भेट देत पाहणी केली़ गुरुवारी समितीने दिलेल्या भेटीचा अहवाल दोन दिवसात आदिवासी आयुक्त यांना सादर करण्यात येणार आह़े सलसाडी आश्रमशाळेत शॉक लागून विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांच्यावर हल्ला होऊन मारहाण झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत नाशिक येथील आदिवासी आयुक्तांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने भेट देत पाहणी केली़ गुरुवारी समितीने दिलेल्या भेटीचा अहवाल दोन दिवसात आदिवासी आयुक्त यांना सादर करण्यात येणार आह़े सलसाडी आश्रमशाळेत शॉक लागून विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांच्यावर हल्ला होऊन मारहाण झाली होती़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आदिवासी आयुक्तालय नाशिक यांनी तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करत पाहणी करण्याचे आदेश दिले होत़े यानुसार गुरूवारी आयुक्तालयातील अधिकारी लक्ष्मीकांत नेवाडकर, सुरेखा जाधव, सहायक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांनी भेट देत पाहणी केली होती़ या          पाहणीत त्यांनी घटनास्थळ व आश्रमशाळेच्या सुविधांची पाहणी केली़ या समितीने मुख्याध्यापक, व्यवस्थापक, कर्मचारी यांच्याकडून माहिती घेत विविध विषयांवर             चर्चा केली़ यावेळी त्यांनी  विद्याथ्र्याना मिळणा:या सुविधांची तपासणी केली़ सकाळी 10 वाजेपासून त्यांनी सुरू केलेल्या चौकशी दरम्यान कर्मचा:यांना घटनेच्या दिवशीच्या घडामोडींची विचारणा केली़ यात प्रामु्ख्याने उपस्थित असलेल्या शिक्षकांकडून माहिती जाणून घेतली़ आश्रमशाळा प्रशासनातील कर्मचा:यांचीही यावेळी विचारपूरस करण्यात आली़ सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ समिती आश्रमशाळेतील विविध भागात फिरून माहिती जाणून घेत होती़ समितीकडून सलसाडी आश्रमशाळेतील पाहणीचा अहवाल दोन दिवसात आयुक्त यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े राज्यभरात गाजलेल्या या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभारही समोर आला आह़े घटनेनंतर आदिवासी आयुक्त यांनी याठिकाणी भेट देण्याची अपेक्षा होती़ परंतू त्यांनी समिती पाठवून माहिती घेतली आह़े येत्या काळात आयुक्तांकडून दौरा करण्यात येणार असल्याची शक्यता आह़े