परिसरातील एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. या शाळेमुळे परिसरात शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दर्जेदार बांधकाम आणि शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शाळेच्या परिसरात स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गमे यांच्या हस्ते एनएसई फाउंडेशन आणि सीवायडीए संस्थेतर्फे कुपोषण कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या दोन हजार किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
मानव विकास मिशनअंतर्गत तोरणमाळ येथील यशवंत तलावात उभारण्यात आलेल्या पिंजऱ्यातील मत्स्यपालन प्रकल्पाची माहिती घेतली. त्यांनी गटातील महिलांशीदेखील संवाद साधला. जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली.