शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

एकाच वेळी सर्व अंगणवाडींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषण विषयक नेमकी वस्तूस्थिती स्पष्ट होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने एकाच दिवशी व्यापक स्तरावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषण विषयक नेमकी वस्तूस्थिती स्पष्ट होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने एकाच दिवशी व्यापक स्तरावर मोहीम राबवून बालकांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश राज्य आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. पंडित म्हणाले, आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या विविध योजनांचा आढावा घेवून आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आढावा समिती आपल्या शिफारशी राज्य शासनाला सादर करेल. या समितीत विविध विभागाच्या प्रधान  सचिवांचा समावेश आहे. अधिकारी व कर्मचा:यांनी संवेदनशीलतेने आदिवासी बांधवांसाठीच्या  योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील कुपोषणाची नेमकी स्थिती स्पष्ट होऊन त्यावर उपाययोजना होण्यासाठी जिल्हाधिका:यांच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात एक दिवसीय मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत  विविध विभागांचे गट अ, ब व क अधिका:यांची नियुक्ती करावी. जिल्ह्यातील रिक्त पदे भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या विविध सेवांच्या माध्यमातून नियुक्त होणा:या अधिकारी व कर्मचा:यांची पहिली नियुक्ती नंदुरबारसारख्या     दुर्गम जिल्ह्यात व्हावी अशी         सूचना जिल्हाधिकारी डॉ.भारूड    यांनी केली. ही महत्वपूर्ण सूचना समिती राज्य शासनाला सादर     करेल. नर्मदा- तापी योजनेचा लाभ धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतक:यांनाही व्हावा व कमीत कमी कुटुंबे विस्थापित होतील, असे नियोजन करावे. तसेच आधी पुनर्वसन मग काम सुरू करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार होवून वैद्यकीय अधिका:यांना ग्रामीण भागात राहण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून महिन्यातून एक दिवस आपण स्वत: दुर्गम भागात मुक्कामाला जाणार असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी थांबावेत म्हणून त्यांची बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडावी, अशीही सूचना त्यांनी    केली. यावेळी पंडित यांनी नवसंजीवनी योजना, बांधकाम, सामाजिक वनीकरण, वनहक्क कायदा, आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी डॉ. कांतिलाल टाटिया, प्रतिभा शिंदे, लतिका राजपूत, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिका:यांनी मुख्यालयी थांबणे आवश्यक आहे. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी थांबणार नाहीत, त्यांच्यावर वेतन बंदची कारवाई करण्यात येईल. गर्भवती महिलांची रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी माहेर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी आरोग्य विभागाने करावी.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देत स्थलांतर थांबवण्यासाठी अधिकारी व कर्मचा:यांनी प्रय} करावेत. अशाप्रकारे प्रय} करणा:या अधिकारी-कर्मचा:यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येईल, असे पंडित यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दरमहा आढावा घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.