शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सात शाळांमध्ये पोलिसांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:35 IST

बोगस लेटरपॅड व शिक्के : कागदपत्रांबाबत शाळाही अनभिज्ञ

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : जिल्हा परिषदेत अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक प्रकरणी पोलिसांना विविध धागेदोरे मिळू लागले आहेत. अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शहादा तालुक्यातील सहा तर चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत चौकशी केली असून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, दोन शिक्षणाधिकारी व चार कर्मचा:यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 3 एप्रिलला उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.जिल्हा परिषदेत बोगस अपंग युनिट दाखवून 71 जणांना संशयीतरित्या नियुक्ती देण्यात आली होती. चौकशीअंती त्यातील 31 जणांवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतार्पयत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 12 शिक्षकांना अटक केली आहे. हे सर्व शिक्षक अद्यापही कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ठिकठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. या तपासादरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी आढळून येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे याचा अंदाज पोलिसांना येवू लागला आहे. शाळांची तपासणीअटक करण्यात आलेल्या शिक्षकांनी कशी नियुक्ती मिळविली याची माहिती मिळवून प्रकरणाचे तपास अधिकारी ठिकठिकाणच्या शाळांमध्ये जावून कागदपत्रांची तपासणी आणि संबधितांचे जाबजबाब घेत आहेत.चार दिवसांपूर्वी तपासी पथकातील पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यतील बोरदेबुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेत जावून तपासणी केली. तेथे यापूर्वी कधीही अपंग युनिट दाखविण्यात आलेले नसल्याचे तेथील शिक्षकांनी जबाब दिले. त्यांना दाखविण्यात आलेली शाळेची कागदपत्रे व शिक्के देखील नकली असल्याचे शाळेतील संबधितांनी सांगितल्याचे समजते.शनिवारी तपासी पथक पुन्हा शहादा तालुक्यातील सहा शाळांमध्ये गेले होते. तेथे देखील अनेक धक्कादायक कागदपत्रे व जबाब त्यांच्या हाती लागले. पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लंगडी भवानी, नवानगर, शहाणा, ओझर्टा, डोंगरगाव व जावदे येथील शाळांमध्ये पोलिसांनी चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व शाळांमधील      मुख्याध्यापक व शिक्षकांनी अशा प्रकारचे अपंग युनिट आमच्या शाळेत कधीही नव्हते व कुणीही शिक्षक अशा युनिटमध्ये कार्यरत नसल्याचा जबाब लिहून दिला. याशिवाय पोलिसांनी त्यांना त्या त्या शाळेची जी कागदपत्रे दाखविली ती देखील बोगस असल्याचे लिहून देण्यात आले  आहे. सूत्रधार शहादा तालुक्यातीलचया शाळांच्या नावे बोगस कागदपत्रे तयार  करून देणारा सूत्रधार हा शहादा तालुक्यातीलच असल्याचे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षकांनी देखील त्याचे नाव    सांगितलेले आहे. त्यामुळे आता पोलीस संबधित सूत्रधारांर्पयत कधी पोहचणार याकडे लक्ष लागून आहे.बोगस लेटरपॅड व शिक्केसंबधीत शाळांच्या नावे बोगस कागदपत्रांसह शाळांचे लेटरपॅड, शिक्के व तत्कालीन मुख्याध्यापकांच्या नावाच्या सह्या देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे काहीही संबध नसतांना अशा मुख्याध्यापकांना आता चौकशीला सामोरे जावे लागत आहे.