शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

निवडणूक काळात बँका देणार संशयास्पद व्यवहारांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुक कालावधीत बँकांनी संशयीत मोठय़ा व्यवहारांची  माहिती प्रशासनाला लागलीच द्यावी.  अशा व्यवहारांवर लक्ष ठेवावे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणुक कालावधीत बँकांनी संशयीत मोठय़ा व्यवहारांची  माहिती प्रशासनाला लागलीच द्यावी.  अशा व्यवहारांवर लक्ष ठेवावे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.बालाजी मंजुळे यांनी बैठकीत दिल्या.जिल्ह्यातील बँक अधिका:यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, निवडणुकीची   आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्याचे पालन सर्व यंत्रणांनी करणे    आवश्यक आहे. निवडणूक कालावधीत एक लाखापेक्षा अधीकचा व्यवहार झाल्यास त्याची माहिती निवडणूक अधिका:यांना देण्यात यावी. दहा लाखापेक्षा अधिकचा व्यवहार झाल्यास आयकर विभागाला तात्काळ सुचना देण्यात यावी. एकाच खात्यातून अनेक खात्यांवर व्यवहार झाल्यास किंवा संशयास्पद रकमा वर्ग केल्याचे आढळल्यास त्याबाबतही माहिती देण्यात यावी. बँकांच्या रोख रक्कमेची वाहतूक करणा:या वाहनचालक व कर्मचा:यांनी सोबत आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्रे बाळगणे आवश्यक आहे. निवडणूक लढविणा:या उमेदवारांनी निवडणूक कालावधीत निवडणुकीसंबधी आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे आणि बँकेमार्फत  देण्यात येणा:या सुविधा उमेदवारांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या. जिल्ह्यात संसयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिका:यांची नेमणूक करण्यात आली असल्याची आणि निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर लक्ष देण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र पथके देखील स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र खर्च निरिक्षक नेमण्यात येणार आहेत. उमेदवारांना दहा हजारापेक्षा अधिकचे व्यवहार धनादेशाद्वारे करावे लागणार आहेत. उमेदवाराच्या खर्चाची नोंद स्वतंत्र नोंदवहित करण्यात येणार असल्याची   माहितीही यावेळी जिल्हाधिका:यांनी दिली.