शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डीपीडीसीच्या कामानची ऑडीटच्या स्वरूपात माहिती उपलब्ध व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डीपीडीसीच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. निधीच्या माध्यमातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डीपीडीसीच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. निधीच्या माध्यमातून किती लाभाथ्र्याना लाभ झाला, किती योजना पुर्ण झाल्या याची फलश्रूती दिसण्यासाठी ऑडीट स्वरूपात माहिती उपलब्ध झाली पाहिजे. अशा सुचना देत डीजीटल लायब्ररीसाठी तातडीने पाऊले उचलावी असेही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समिती कार्यकारी मंडळाची बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., विनय गौडा, नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.रावल म्हणाले, कला व सांस्कृतिक विभागामार्फत पुढच्या वर्षापासून महोत्सव घेण्यात यावा. यासाठी पर्यटन व जिल्हा नियोजन समिती जिल्हा ग्रंथालय विभागास निधी उपलब्ध करून देईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणा:या विद्यार्थी व वाचकांसाठी शासकीय गं्रथालयात डिजीटल लायब्ररी कार्यान्वीत करण्यासाठी तातडीने पाऊले उचलले जातील. यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कृषी विभागास मोठय़ा प्रमाणात निधी दिला जातो. परंततु 45 ते 50 टक्के कृषी उन्नतीसाठी वापरले जाते. भविष्यात 100 टक्के कृषी क्षेत्राच्या उत्पादनासाठी वापर व्हावा यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले. कृषी सिंचनाच्या माध्यमातून आदिवासी शेतक:यांना विहिर, पाईपलाईन, वीज जोडणी यासाठी दोन लाख 50 हजार रुपये दिले जातात. या योजनांचा अधिकाधिक आदिवासी शेतक:यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री रावल यांनी केले. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात वाव असून तापी, नर्मदा नदी तसेच सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज येथे मत्स्यबीज मोठय़ा प्रमाणात टाकावे. यातून मत्स्यव्यवसायाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यातील अमरावती प्रकल्पाचा जोड कालवा व शहादा तालुक्यातील रहाटय़ावड धरणाच्या कामासाठी तसेच अपुर्ण राहिलेल्या बंधा:यांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात अनेक योजना अपुर्ण असून त्यापुर्ण करण्यासाठी अधिका:यांना कामाला लावावे. यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वापरावा असेही त्यांनी सुचविले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी प्रास्ताविकात सर्व यंत्रणांनी कामांची गती वाढवावी व मार्च अखेर मिळालेला निधी खर्च करावा अशा सुचना दिल्या. सर्व विभागाची कामे, योजना यांना आलेला निधी वेळेवर खर्च व्हावा यासाठी प्रय} सुरू आहेत. मार्च अखेर निधी शिल्लक राहणार नाही यासाठी सर्व संबधीत विभागांना सुचना देण्यात आल्या आहेत. लवकरच होणा:या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. शिल्लक निधी राहिल्यास संबधीत विभाग आणि अधिका:यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.