शिंदे चाैफुलीवर उपाययोजनांची गरज
नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबारदरम्यान महामार्गावर शिंदे फाट्याजवळ उपाययोजनांची गरज आहे. शिंदे फाट्यावर बायपास काढण्यात आला आहे. या मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. यातून महामार्गावरून भरधाव वेगात जाणारी वाहने आणि शिंदे गावाकडे येणारी वाहने यातून अपघाताची शक्यता आहे. यामुळे याठिकाणी तातडीने गतिरोधक टाकण्यासह विविध उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात यंदा पाणकोबी व सिमला मिरचीचे उत्पन्न चांगले आहे. हा माल शेतकरी बाजारपेठेऐवजी थेट रस्त्यावर जाऊन विकत आहेत. यातून नंदुरबार ते प्रकाशा, नंदुरबार ते रनाळे, विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर भाजीपाला विक्री करणारे शेतकरी दिसून येत आहेत. यातून बाजारपेठेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याने, बहुतांश शेतकरी अशी विक्री करत आहेत.
वेगवान डंपरमुळे नागरिक त्रस्त
नंदुरबार : शहरातील तळोदा रोड मार्गाने धुळे चाैफुलीकडे दर दिवशी भरधाव वेगात धावणारे डंपर नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. वाळू भरलेले तसेच रिकामे डंपर तीव्र वेगाने इतर वाहनांना कट मारून जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. याबाबत आरटीओ विभागाकडून कारवाईची मागणी केली जात आहे.