लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात एरंडी पिकावर अळ्यांच्या प्रादुर्भाव झाला आहे. या अळ्यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.एरंडीला तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात मोठी मागणी असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी एरंडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु मागील दोन वर्षापासून या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पन्नात घट येत आहे. यंदा हा प्रादुर्भाव अधिकच जाणवू लागला आहे. या पिकावर अळ्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पिकाचे नुकसान होत आहे.या अळ्यांचे पिकाच्या पानावर आक्रमण होऊन संपूर्ण पान हळूहळू खाऊन टाकत असल्याने पीक निरुपयोगी ठरत आहे. वाढदेखील खुंटत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: पानाच्या पृष्ठभागावर या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सध्या एरंडी पिकाची वाढ होण्यासाठी हे पोषक दिवस आहेत. परंतु ऐन वाढीच्यावेळी अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकºयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या अळ्यांचा प्रादुर्भाव इतर पिकांवरही होतो की काय अशी चिंता शेतकºयांना सतावत असून कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे.
एरंडी पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:40 IST