शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांच्या मतांमुळे प्रमुख उमेदवारांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 21:26 IST

नंदुरबार : मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जेमतेम राहत असली तरी अनेक वेळा तेच अपक्ष मुख्य लढत असलेल्या उमेदवारांना डोईजड ...

नंदुरबार : मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जेमतेम राहत असली तरी अनेक वेळा तेच अपक्ष मुख्य लढत असलेल्या उमेदवारांना डोईजड ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन निवडणुकांचा विचार करता २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रमुख दोन उमेदवारांमधील विजयाचे अंतर ४०,८४३ मतांचे होते तर केवळ दोनच अपक्ष उमेदवारांनी यापेक्षा जास्त अर्थात ४१ हजार ३ मते घेतली होती.प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात असतात. कधी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून काही पदरी पाडून घेणे तर कधी दुर्लक्षीत केले गेल्यामुळे संबधीतांना आपली ताकद दाखवून देणे हा त्यामागील उद्देश असतो. काही वेळा समाज, संघटना किंवा पक्षातील अंतर्गत वाद देखील अपक्ष उमेदवारास उभे करण्यास कारणीभूत ठरतात.नंदुरबार लोकसभा मतदार संघातील गेल्या दोन वेळच्या लढतींचे चित्र पहाता अपक्षांमुळे निवडून येणारा उमेदवार पडल्याचे चित्र दिसून येते.२००९ मधील निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि भाजप उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार समाजवादी पार्टीच्या उमेदवारापेक्षा केवळ ४० हजार ८४३ मताधिक्यांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत केवळ दोनच अपक्ष उमेदवार असतांना दोघांनी विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा अधीक अर्थात ४१ हजार ३ मते मिळविली होती. त्यावेळी समाज फॅक्टर अपक्ष उमेदवाराच्या कामी आला होता. परिणामी अपक्षांनी घेतलेली मते पराभूत उमेदवाराचे नुकसान करणारी ठरली होती.२०१४च्या निवडणुकीत एकुण तीन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तिघांनी मिळून १९ हजार ५७६ मते मिळविली होती. परंतु या निवडणुकीत अपक्षांची लाभ-हाणी फारसी जाणवली नाही. कारण मोदी लाटेत विजयी उमेदवाराचे मताधिक्य लाखावर अर्थात एक लाख ६ हजार ४८६ इतके होते.या निवडणुकीत तब्बल सात उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.