शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:18 PM

जनजागृती गरजेची : पाच वर्षात दीड हजार जणांना सर्पदंश, पावसाळ्यात समस्या

नंदुरबार : गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विशेष म्हणजे वर्षागणिक हा आकडा वाढत जात असल्याचे चित्र समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आह़े यात, सर्पदंशाच्या घटना विशेषत ग्रामीण भागात, शेतशिवारात अधिक घडत असल्याचे निरीक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आह़े 2013 पासूनच्या सर्पदंशाच्या घटनांची आकडेवारी बघता, वर्षनिहाय यात वाढ झाल्याचे दिसून येत आह़े वर्षनिहाय सर्पदंशाच्या घटना पुढील प्रमाण - 2013-2014  189, 2014-2015 288, 2015-2016  306, 2016-2017 317, 2017-2018 335 तर एप्रिल-मे 2018 या दोन महिन्यात 25 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत़ अशा प्रकारे गेल्या पाच वर्षात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झालेला आह़े सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये साप, इंगळी, विंचू आदी प्राणी जमिनीबाहेर पडत असतात़ त्यातच पावसाळ्यात शेक:यांची खरिप हंगामाची पेरणी, मशागत आदी शेती कामे जोमात असतात़ त्यामुळे शेतशिवारात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडताना दिसून येत असतात़ परंतु या घटनांची संख्या वर्षागणिक वाढतच असल्याने ही बाब चिंतेची ठरत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण होतात दाखलजिल्ह्यातील अक्कलकुवा तसेच धडगाव आदी तालुक्यांमधील दुर्गम भागात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात आल़े आधीच जंगली परिसर असल्याने या ठिकाणी सर्पाचा मोठय़ा संख्येने सुळसुळाट असतो़ त्यातच                या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची घरेसुध्दा उंचावर नसून जमिनीलगतच लाकडी बांबू, कौले आदींपासून बनवलेली असल्याने याठिकाणी घरात प्रवेश करणे सरपटणा:या जनावरांसाठी सहज सोपे असत़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी पथदिवे तसेच वीजेचा अभाव असल्याने अंधारात सर्पदंश होण्याच्या घटना अधिकच वाढताना दिसून येत           आह़े जनावरांनाही होताय सर्पदंशमनुष्यासह गोठय़ात बांधलेल्या गाय, बैल, बकरी आदी पाळीव जनावरांनाही सर्पदंश होऊन जनावरे दगावण्याच्या घटना दुर्गम भागात घडत असतात़ पशु दगावल्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत असत़े जनजागृतीची आवश्यकतादुर्गम भागात सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती किंवा माहिती नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारंपारिक उपचार पध्दतीने उपचार घेण्यास प्राधान्य देत असतात़परंतु यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असत़े त्यामुळे आरोग्य विभागाकडून याची दखल घेत सर्पदंश झाल्यावर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती करणे गरजेचे आह़ेरुग्णवाहिकांअभावी अडचणीपावसाळी दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना समोर येत असतात़ सर्पदंशाचे रुग्ण जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असतात़ परंतु अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना नेण्याची वेळ येत असत़े परंतु काही वेळा रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असतात़ लवकर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यताही नकारता येत नाही़त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आह़े