शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

देखभाल दुरुस्तीचा वाढतोय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:42 IST

शहादा चालक प्रशिक्षण केंद्र : तिन सुरक्षारंक्षकांची नेमणूक, उद्घाटनाची प्रतीक्षा

नंदुरबार : शहादा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून उभारण्यात आलेल्या चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाअभावी देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत आह़े गेल्या वर्षभरापासून े प्रशिक्षण केंद्राचे काम पूर्ण झाले असले  तरी केवळ परिवहन मंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन रखडले आह़ेराज्यातील निवड दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आह़े त्यात, आदिवासीबहुल भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याला महत्व देण्यात येऊन शहादा तालुक्यात चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आल़े परंतु साधारणत: वर्षभरापूर्वी या प्रशिक्षण केंद्राचे संपूर्ण काम झाले असल्यावरही केवळ धुळे विभागीय कार्यालयाच्या अट्टाहासामुळे चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रखडले  आह़े परिणामी सर्व सोय करुनही केवळ उद्घाटन होत नसल्याच्या कारणाने हे प्रशिक्षण केंद्र धुळखात पडले आह़े एसटी महामंडळाकडून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेले आह़े राज्यात यवतमाळ येथे हे केंद्र सुरु झाले असून त्यानंतर दुसरे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा:या नंदुरबारची निवड करुन हे चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आल़े त्यासाठी शहादा बस आगाराच्या इमारतीत या केंद्राची उभारणी करण्यात आलेली आह़े या केंद्रात अनुसूचित जमातीच्या  युवकांना चालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी येथे निवासाची सोयसुध्दा उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आह़े परंतु उद्घाटनाच्या कारणावरुन आतार्पयत हे प्रशिक्षण केंद्र सुरु होण्यास विलंब होत आह़े एकीकडे आदिवासी विद्यार्थी तसेच युवकांसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारे आदिवासी युवकांच्या कल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी होत नाही़साहित्ये भंगारात काढण्याची वेळचालक प्रशिक्षण केंद्रात बहुतेक साहित्ये ही काचेची असून अनेक ठिकाणी फर्निचरचा वापर करण्यात आला आह़े सर्व सोयीसुविधा असलेल्या या प्रशिक्षण केंद्रातील इतर सामान अनेक महिन्यांपासून धुळखात आह़े त्यामुळे साहजिकच यातील बराचसा सामान आता हळूहळू खराब होत आह़े अशी स्थिती अजून काही महिने राहिल्यास प्रशिक्षण केंद्रातील महागडे साहित्ये भंगारात काढण्याची वेळ येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आह़े लाखो रुपये खर्च करुन हे चालक प्रशिक्षण केंद्र शासनाकडून उभारण्यात आले आह़े परंतु अशा प्रकारे ते पडून राहिल्याने यातून शासनाचाच पैसा वाया जात असल्याने जनसामान्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आह़ेप्रशिक्षण केंद्राच्या अगोदर या ठिकाणी तळीरामांचा मोठय़ा प्रमाणात वावर असायचा़ त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम झाल्याने या ठिकाणी तळीरामांवर वचक निर्माण झाला होता़ परंतु आता ब:याच महिन्यांपासून हे प्रशिक्षण केंद्र जसेच्या तसेच असल्याने पुन्हा या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होऊन ते कार्यान्वित झाल्यास अनुचित घटनांनाही या ठिकाणी आळा बसणार आह़ेधुळे विभागाचे तळ्यात-मळ्यातप्रशिक्षण केंद्राबाबत विभागीय कार्यालय धुळे येथील विभाग नियंत्रकांनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आह़े परंतु धुळे विभागाचेही प्रशिक्षण केंद्राबाबत तळ्यात-मळ्यात असल्याची स्थिती आह़े त्यामुळे शहादा आगार प्रशासनालाही पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून येत आह़े प्रशिक्षण केंद्र हे निवासी आह़े स्थानिक तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी येथे निवासाची सोय उपलब्ध करुन द्यावी लागणार आह़े त्यामुळे शहादा आगारालाच प्रशिक्षणार्थीसाठी ठेकेदारी पध्दतीने जेवनाची व्यवस्था, निवासाची सोय, गादी, पलंग आदी विविध आवश्यक वस्तूंची सोय करुन द्यावी लागणार आह़े परंतु अद्याप उद्घाटनांची ‘घटीका’ समिप येत नसल्याने शहादा आगारालाही हातावर हात ठेवण्याची वेळ आली आह़े प्रशिक्षण केंद्राच्या देखभालीसाठी तसेच त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आगार प्रशासनाकडून तीन सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आह़े