शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

रेल्वेतील गुन्हेगारीत होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:00 IST

चोरीसाठी बालकांचा वापर : साडेचार वर्षात 328 गुन्ह्यांमध्ये साडेतीन कोटी रुपयांची लूट

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे बघता, रेल्वेतील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत़े 2014 ते एप्रिल 2018 र्पयत म्हणजे सुमारे साडेचार वर्षात एकूण 328 गुन्ह्यांमध्ये तब्बल 3 कोटी 40 लाख 48 हजार 968 रुपयांच्या मुद्देमालाची लूट झाली आह़े पैकी, लोहमार्ग पोलिसांकडून केवळ 11 लाखांचा मुद्देमला ‘रिकव्हर’ करण्यात आला  आह़े गेल्या दोन वर्षात सूरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे जाळे अधिक विस्तारले आह़े नवापूर रेल्वे स्थानक ते पाळधी रेल्वे स्थानक अशा सुमारे 207 किलोमीटर अंतरांतर्गत एकूण 23 रेल्वे स्थानके नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत समाविष्ट होतात़ साधारणत 2016 पासून रेल्वेमध्ये लूटीच्या घटना वाढल्या असल्याचे लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आह़े यात, महिलांची छेडछाड, हाणामारी, जबरी लूट, मोबाईल चोरी, सोनं-चांदी, दागिण्यांची चोरी आदी गुन्ह्यांमध्ये लक्षणिय वाढ होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े आरोपी सूरतमध्ये जातात पळून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा संख्येने चोरटे हे उधना तसेच सूरत येथे पळून जात असतात़ त्यामुळे त्याच ठिकाणी अनेक वेळा चोरटय़ांचा छळा लागत असतो़ त्याच प्रमाणे लोहमार्ग पोलिसांचा वेळसुध्दा सूरत तसेच उधना येथेच सर्वाधिक जात असतो़ या सर्व चो:यांमध्ये मोबाईल चोरीच्या घटना सर्वाधिक असतात़ उधना रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच बाजार भरत असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लुटीचा माल विकला जात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आल़े त्यामुळे रेल्वेत कुठेही चोरी झाल्यास प्रथम उधना तसेच सूरत या दोन ठिकाणीच लक्ष केंद्रीत करावे लागत असल्याचेही सांगण्यात आल़े गुन्ह्यांमध्ये मोठी आर्थिक लूटरेल्वेत लुटमारीच्या अनेक घटना घडत असून त्यामुळे पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान होत आह़े परंतु लुटीच्या मानाने लोहमार्ग पोलिसांना माल हस्तगत करण्यात पाहिजे तसे यश मिळालेले दिसून येत नाही़ वर्षनिहाय लुटीला गेलेला माल - 2014 मध्ये 14 लाख 17 हजार 618 रुपयांची लूट तर, 1 लाख 28 हजार 119 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता़ त्याच प्रमाणे 2015 - 2 कोटी 3 लाख 1 हजार 525 रुपयांची लुट तर, 87 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, 2016 - 13 लाख 11 हजार 290 रुपयांची लुट तर 3 लाख 99 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, 2017 - 98 लाख 67 हजार 734 रुपयांची लुट तर, 4 लाख 15 हजार 201 रुपयांचा मुद्देमाल हस्तग व एप्रिल 2018 र्पयत 11 लाख 48 हजार 968 रुपयांची लुट तर 68 हजार 619 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े अशा प्रकारे एकूण साडेचार वर्षात तब्बल 3 कोटी 40 लाख 47 हजार 138 रुपयांची लुटमार झाली असून त्यापैकी 10 लाख 98 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नंदुरबार लोहमार्ग पोलिसांना यश आले आह़ेरेल्वे स्थानकांवरील सुरक्षा गरजेचीगेल्या वर्षाची दाखल गुन्ह्यांची आकडेवारी बघता दिवसेंदिवस रेल्वेतील गुन्हेगारी वाढत आह़े त्याच प्रमाणे रेल्वे स्थानकांची सुरक्षासुध्दा दुर्लक्षित केली जात आह़े रेल्वे स्थानकावर कोण कुठल्या उद्देशाने फिरकत आहे, याचा तपास करण्यास सुरक्षा कर्मचारी कुठेतरी कमी पडत असल्याची भावना जनसामान्यांमध्ये उमटत आह़े त्यामुळे साहजिकच रेल्वे स्थानकाच्या व पर्यायाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचा ठरत आह़े रेल्वे स्थानकावर अनेक तळीराम तसेच गुन्हेगारी, गुंड प्रवृत्तीचे मंडळींनी आपले साम्राज्य निर्माण केले आह़े लुटमारीतून त्यांच्याकडे मोठी ‘माया’ जमा झाली आह़े घरातून पळून गेलेल्या बालकांनासुध्दा चोरीच्या गोरख धंद्यामध्ये उतरवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ स्वाभाविकपणे लहान मुलांवर  चोरीचा संशय घेतला जात नाही़ त्यामुळे हीच मानसिकता लक्षात घेत चोरीच्या विश्वातील बडय़ा मास्यांकडून लहान मुलांची तस्करी करुन त्यांना चोरी करण्यास भाग पाडले जात असत़े