शहादा : सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमुळे पाणीदार तालुका अशी ओळख असलेल्या शहादा तालुक्यात यंदा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे़ गेल्या दोन महिन्यांपूर्वी ४१ गावे आणि १५ पाडे पाणीटंचाईग्रस्त होती़ यात वाढ झाली असून तालुक्यात २० गावे नव्याने टंचाईग्रस्त असल्याचे समोर आले आहे़१ लाख ३ हजार ५६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहादा तालुक्यातील १८० गावांपैकी ४१ गावे यंदा तीव्र टंचाईचा सामना करत आहेत़ यातून ८६ हजार १४५ नागरिक बाधित झाले आहेत़ तालुक्याच्या एकूण ४ लाख ७ हजार ९६८ लोकसंख्येपैकी एकतृृतीयांश नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसत असल्याने प्रशासनाने तात्पुरती योजना आणि हातपंप टाकण्याचे काम हाती घेतले होते़ यानंतरही येथील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करत आहेत़ दरम्यान तालुक्यातील २० गावे नव्याने टंचाईग्रस्त म्हणून समोर आली आहेत़ या गावांकडून उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दिले असल्याची माहिती आहे़ परंतू त्यावर कारवाई सुरु झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे़ केवळ एका महिन्यात गावांची संख्या २० झाल्याने चिंता व्यक्त होत असून जून महिन्यापर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे़ शहादा तालुक्यातील ओझर्टा, उजळोद, कवठळ त़श, कुकावल, कोठली त़सा, कुरंगी, गोगापूर, चिरखान, चांदसैैली, चांदसैैलीचा घोडलेपाडा, जावदे त़ह, टेंभे त़श, टेंभली, होळ गुजरी, आसुस, दामळदा, धांद्रे बुद्रुक, नागझिरी, नंबरपाडा, अंधारपाडा, आदल्यापाडा, भुरीनमळपाडा, कुंड्यापाणी, शंकरपाडा, आमलीपाणी, कहाटूळ, निंभोरा, जयनगर, उभादगड, न्यू असलोद, पिंपर्डे, भोंगरा, मंदाणा, बामखेडा त़त़, बोराळे, भातकुट, जाम, भोरटेक, चिखली खुर्द, भुलाणे, सटीपाणी, मलगाव, राणीपूर, केलापाणी, लोंढरे, लक्कडकोट, लोहारे, तिधारे, कलमाड त़ह़, वरुळ त़श, सोनवद त़श, सावळदा, लोणखेडा, नांदर्डे, अभणपूर, वाघोदा ही गावे तीव्र टंचाईग्रस्त म्हणून गणली जात आहेत़
शहादा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 20:47 IST