लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील जनता पार्कमधील गल्ली क्रमांक आठमधील ३६ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह झाल्याने येथील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २१ झाली आहे.जनता पार्क गल्ली क्रमांक आठ मधील ३६ वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा स्वॅॅब घेण्यात आला होता. स्वॅब घेतल्या नंतर ते घरीच क्वारंटाईन झाले होते. दरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पुरवठा अधिकारी मिलींद निकम, पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी भेट देउन पाहणी केली. प्रशासनाकडून परिसर सील करून कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात इतर आजाराचे उपचार घेत असलेल्या येथील एका ५६ वर्षीय इसमाचे शनिवारी सायंकाळी निधन झाल्याने त्यांचेवर नंदुरबार येथेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.नवापूर तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता २१ झाली आहे. दुसरीकडे आठवड्याच्या संचारबंदीच्या चौथ्या दिवशी शहरात संपुर्ण बंद पाळण्यात आला. मात्र जवळच्या उच्छल येथे बाजार खुला असल्याने भाजीपाला खरेदी साठी सोयीचे झाले आहे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णत: बंद होते़नवापूर शहरात पोलीसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त उभारला होता. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करा, सॅनिटायझर व मास्कचा वापर करुन शासनाकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे तहसिलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
नवापूरात कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:47 IST