लोकमत न्यूज नेटवर्ककळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात आहे. यामुळे वृक्षांना जाळून मोठी हानी होत आहे.अनेक वर्षांपासून उभे असलेले डेरेदार वृक्ष जे उन्हाळ्यात मनुष्य व प्राणीमात्रांना छाया देतात व आकाशात उडणाऱ्या पक्षांना विसावा देतात अश्या हिरवेगार व डेरेदार वृक्षांच्या जाळपोळीच्या घटनांमुळे मोठी हानी होत आहे. त्यामुळे परिसरातील वृक्षमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.एकीकडे महाराष्ट्र सरकार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ कोटी वृक्षांची लागवड करते व त्यात किती वृक्ष जगली हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अश्या वृक्ष जाळपोळीच्या घटनांमुळे अनेक वर्षांपासून पर्यावरणाच्या सौंदर्यात भर घालणाºया वृक्षांची हानी होत असल्याने अश्या घटना न होता.वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें !पक्षी ही सुस्वरें आळविती!या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवीतून मानवाने बोध घेऊन वृक्षांना आपले मित्र समजून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष जोपासना व संगोपन करणे हीच काळाची गरज आहे. तरी संबंधीत वन विभागाने वृक्ष जाळपोळीच्या घटनांची दखल घ्यावी अशी, मागणी वृक्ष मित्रांकडून होत आहे.
सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर वृक्ष जाळण्याच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:11 IST