शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुख्यमंत्र्याच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन व पालिका इमारत भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पालिकेने तयार केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पालिकेने तयार केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे १५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे़ यादरम्यान पालिकेच्या प्रस्तावित नव्या इमारत बांधकामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली़१५ फेब्रुवारी रोजीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी त्यांनी सांगितले की, नंदुरबार पालिकेच्या दोन कोटी २० लाख रुपये खर्चाच्या पालिका जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे़ हा तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे़ या तलावाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे़ या तलावाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री यांना निमंत्रण दिले होते़ त्यांनी ते स्विकार केले आहे़ दरम्यान जुन्या कोर्टाच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्याहस्ते होणार आहे़ तीन कोटी रुपयांच्या या बांधकामाला शासनाकडून मंजूरी देण्यात आले आहे़पुढे रघुवंशी यांनी सांगितले की, १५ रोजी सकाळी १०़३० वाजता मुख्यमंत्री हे शहरात येणार आहेत़ दोन्ही ठिकाणी कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर जी़टी़पी महाविद्यालय प्रांगणात त्यांची जाहिर सभा आणि नंदुरबार नगरपालिका आणि नागरिकांच्यावतीने जाहिर नागरी सत्कार होणार आहे़ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी राहतील़ तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय राऊत, मंत्री दादा भुसे, धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय प्रमुखांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे़शेवटी चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौºयादरम्यान जिल्ह्यातील आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रात प्रलंबित असलेली विकास कामांची माहिती देणार आहे़ यात प्रामुख्याने तापी बुराई उपसा सिंचन योजना, २२ उपसा सिंचन योजना, भालेरची एमआयडीसी यासह नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील बिगर आदिवासी क्षेत्रात गणल्या जाणाºया आदिवासी बांधवांंच्या समस्या मांडणार असल्याची माहिती दिली़ पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ़ विक्रांत मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़