राज्यमार्गांना जोडणाऱ्या रस्ता कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:33 AM2021-01-19T04:33:03+5:302021-01-19T04:33:03+5:30

यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के पाडवी, उपअभियंता राकेश जामनेकर आदी उपस्थित ...

Inauguration of road works connecting state highways by the Guardian Minister | राज्यमार्गांना जोडणाऱ्या रस्ता कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यमार्गांना जोडणाऱ्या रस्ता कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Next

यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के पाडवी, उपअभियंता राकेश जामनेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि येथील विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला. पालकमंत्री याच्या हस्ते साक्री उमर ते जांभापाणी या ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी पाच कोटी ९७ लक्ष रुपये खर्च होणार आहे. त्यासोबतच राज्य महामार्ग एक ते लिंबीपाडा, राज्यमार्ग तीन ते आमराईपाडा, मोलगी ते उखली, वगडोनगामल, पाटबारा ते कोतवालपाडा, पाटबारा ते मौलीगव्हाण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. या सर्व कामाची एकूण लांबी साधारण १९ किलोमीटर असून, त्यासाठी सुमारे २१ कोटींपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांनाही चांगली सुविधा निर्माण होईल, असे पालकमंत्री म्हणाले.

Web Title: Inauguration of road works connecting state highways by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.