शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

नवापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापनानिमित्त जनतेला नवापूर               येथील नूतन तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत समर्पित करताना आनंद होत आहे. अशा सुसज्ज इमारतीत जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचा:यांनी कटिबद्ध राहून शासनाच्या कल्याणकारी योजना         ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापनानिमित्त जनतेला नवापूर               येथील नूतन तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत समर्पित करताना आनंद होत आहे. अशा सुसज्ज इमारतीत जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचा:यांनी कटिबद्ध राहून शासनाच्या कल्याणकारी योजना                शेवटच्या घटकार्पयत पोहोचवा, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा पालकमंत्री                जयकुमार रावल यांनी नवापूर येथे केले.येथील मध्यवर्ती प्रशासकीय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात  पालकमंत्री जयकुमार रावल बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक,  आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अ.ल. पवार, सहाय्यक अभियंता एस.बी. पडांगळे, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाघमारे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अजित नाईक, गणेश वडनेरे, नीलेश प्रजापती, जाकीर पठाण, नरेंद्र  नगराळे, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, डिजिटल इंडियाच्या वाटेवर चालताना पारदर्शी कामाची अपेक्षा ठेवून एकाच छताखाली राबविण्यात येणा:या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कार्यालयात येणा:या प्रत्येक नागरिकांचे समाधान म्हणजे आपल्या कामाची पावती समजून पात्र लाभार्थी   वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. एकाच छताखाली  अशा सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यातही मध्यवर्ती प्रशासकीय इमारती उभारण्यासाठी           प्रस्तावीत करण्याचे आवाहन त्यांनी                 केले.आमदार गावीत यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत संकल्पना म्हणजे एका इमारतीमध्ये नागरिकांना सर्व सुविधा मिळणे अशी आहे. या इमारतीमुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर सोय होणार आहे. तसेच सर्व सुविधा सहज व तत्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी या इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालये डिजिटलाईज करण्यात यावीत.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले की, लोकाभिमूख प्रशासन असावे यासाठी सर्व कार्यालये एका ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून, सर्व कार्यालयातील रेकॉर्ड ऑनलाईन करण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचारी हे जनतेचे                   सेवक असून, त्यांनी या इमारतीमध्ये येणा:या जनतेला तत्काळ व चांगल्या सेवा                  द्याव्यात. त्याचप्रमाणे इमारत नवीन  असल्याने इमारतीमध्ये स्वच्छता चांगली ठेवावी.याप्रसंगी इमारतीचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल कंत्राटदार एस.एस. मुर्ती, व्ही.एच. ओतारी व सहाय्यक अभियंता एस.बी. पडांगळे यांचा पालकमंत्री रावल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक आय.जी. पठाण यांनी            केले.