कार्यक्रमास माजी नगरसेवक सुरेंद्र छिंकारा, विलास रघुवंशी, आयएमएचे डॉ.राजेश वळवी, डॉ. विशाल चौधरी, लायन्स क्लबचे डॉ.राजेश कोळी,समीर शाह, शेखर कोतवाल, राजेंद्र माहेश्वरी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यात डॉ.योगेश देसाई यांच्या दबंग्स संघाने डॉ. शिरीष शिंदे यांच्या निम्स संघाला २३ धावांनी पराभूत करत पहिला विजय नोंदवला. या स्पर्धेत शहर आणि परिसरातील विविध पॅथीचे डॉक्टर्स एकत्रितपणे सहभागी होतात. ६० पेक्षा अधिक डाॅक्टर्सचे चार संघ यंदा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आरोग्य सेवा करणारे खासगी व शासकीय क्षेत्रात काम करणारे डाॅक्टर्स महिनाभर क्रिकेटच्या या स्पर्धेत सहभागी होतात.
दररोज सकाळी सात ते नऊ यावेळेत दररोज एक सामना या प्रमाणे २४ फेब्रुवारीपर्यंत क्रिकेट सामने होणार आहेत. अंतिम सामन्याच्या दिवशी पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. १२ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान होईल. शेवटच्या दिवशी फायनल मॅच आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.
स्पर्धेत आयएमए, निमा, आयडीए, होमिओपॅथी डाॅक्टर्स असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, मॉर्निंग क्रिकेट क्लब यांचे सहकार्य लाभत आहे. सूत्रसंचालन राहूल पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ.विजय पटेल, डॉ.रवींद्र पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ.हेमंत चौधरी, डॉ.प्रसाद पटेल, डॉ. भालचंद्र पाटील, डॉ. भूपेंद्र पटेल, डॉ. दिनेश पाटील, डॉ.अमोल पाटील आणि डीपीएल कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले.