पातोंडा येथे पटेल ऑर्गनिक यांच्यातर्फे हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पटेल ऑर्गेनिक फार्मचे मुन्नाभाई पटेल व बाळूभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेती करण्याचा वाढता कल तसेच सेंद्रीय खत म्हणून गांडूळ खत वापरण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्यातून हा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. यांतर्गत १०२ मोठे टेट्रा बेड व दोन शेड तयार करण्यात आले आहेत. या १०२ बेडपासून दर दोन महिन्यांनी १०२ टन गांडळू खत निर्माण होणार आहे. वर्षभरात एकूण १ हजार ते १ हजार २०० टन गांडूळ खताची निर्मिती होणार आहे. या खत प्रकल्पातील प्रत्येक बेडपासून २० लिटर याप्रमाणे २ हजार लिटर गांडूळ पाणीसुद्धा तयार होणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पातोंडा सरपंच व ग्रामस्थ तसेच शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रकल्पाला कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे.
पातोंडा येथे गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST