शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात शासकीय अनास्थेचा ‘कळस’; गर्भवती मातेच्या प्रसूतीला आडोसा झाला ‘पळस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2023 18:15 IST

किलाबाई बिज्या वसावे यांनी पळसाच्या झाडाच्या आडोशाला महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. भरदुपारी जोखीम पत्करून दायी बोंडीबाई आणि किलाबाई यांनी महिलेची जंगलात यशस्वी प्रसूती केली.

किशोर मराठे

वाण्याविहीर : सातपुड्यात रस्त्याअभावी रुग्णालयात झोळी अर्थात बांबूलन्समधून नेण्यात येणाऱ्या गर्भवती मातेला कळा अनावर झाल्याने तिची प्रसूती पळसाच्या झाडाच्या आडोशाला झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील बोडीपाडा येथील ही माता असून बोडीपाडा ते दसरापादर असा तीन किलोमीटरचा रस्ता नसल्याने तिची प्रसूती झाडाखाली करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.

वंतीबाई आबला वसावे असे मातेचे नाव आहे. वंतीबाई ह्या बोडीपाडा येथील रहिवासी असून मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना झोळी करून पती आबला वसावे हे गावातील युवक आणि नातेवाईक महिलांच्या मदतीने दसरापादर येथे आणत होते. दरम्यान, आंबाबारी गावाजवळ जंगलात मातेला प्रसवकळा अनावर झाल्या होत्या. यातून पती आबला राशा वसावे व सोबत दायी बोंडीबाई रावजी तडवी, किलाबाई बिज्या वसावे यांनी पळसाच्या झाडाच्या आडोशाला महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. भरदुपारी जोखीम पत्करून दायी बोंडीबाई आणि किलाबाई यांनी महिलेची जंगलात यशस्वी प्रसूती केली.

प्रसूतीनंतर बाळासह झोळीतून प्रवासप्रसूतीनंतर वंतीबाईचे पती आबला वसावे व गावातील वनसिग मिठ्या वसावे,अंगणवाडी सेविका मोगराबाई वनसिंग वसावे, जान्या रावजी तडवी, कालुसिंग बावजा तडवी, कालुसिंग दोहऱ्या वसावे यांनी ब्रिटिश अंकुशविहिर, ता. अक्कलकुवा येथे संपर्क दसरापादरपर्यंत रुग्णवाहिका बोलावली होती. या रुग्णवाहिकेपर्यंतचे तीन किलोमीटर अंतर हे महिलेने बाळासाह पुन्हा झोळीतून कापले. दुपारी चार वाजता महिला दसरापादर येथे पोहोचल्यानंतर तेथून तिला अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील बोडीपाडा ते दसरापादर मेनरोड तीन किलोमीटर रस्ता नाही. यामुळे येथील नागरिक पायपीट करत दसरापादरपर्यंत जातात. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कौलवीमाळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोडीपाडा येथपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना जिल्हा निर्मितीच्या २५ वर्षांनंतरही साधे आरोग्य केंद्रात जाण्यासाठी झोळी (बांबूलन्स) करावी लागत आहे.