लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या संपर्कातील लोकांनी स्वॅब तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले आहे.दिपक पाटील यांचा मंगळवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी तातडीने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात भरती होत उपचार सुरू केले. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांना कुठलाही त्रास नसून आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे कार्यकर्ते व हितचिंतकांनी काळजी करू नये. लवकरच ते कोरोनामुक्त होऊन घरी परततील. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून स्वॅब तपासणी करून घ्यावी असे आवाहन देखील नगरसेवक तथा प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले आहे.
दिपक पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:07 IST