लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात व्हेंटीलेटर आणि आॅक्सिजनसह सुविधेसह १२० बेड तयार करण्यात आले आहेत़ कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने येत्या काळात हे बेड कमी पडण्याची शक्यता असल्याने नवीन बेड निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे़कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने स्वॅब देणाऱ्यांची संख्या वाढली आहे़ ट्रूनेट आणि रॅपिड अँटीजेन टेस्टमुळे रूग्ण समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे़ यातील गंभीर रुग्णांना तातडीने उपचार देत व्हेंटीलेटर आणि आॅक्सिजनची सुविधा देण्याची सोय जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात २६ बेडला व्हेंटीलेटर व आॅक्सिजन सिलींडर लावण्याची सोय आहे़ दरम्यान रुग्णालय प्रशासनाने नेत्रकक्षात ३२ तर नर्सिंग कॉलेजमध्ये ६२ बेडला आॅक्सिजन सिलींडर लावण्याची सोय करुन घेतली आहे़ या दोन्ही ठिकाणी जंबो सिलींडर लावून रुग्णांच्या शरीरातील आॅक्सिजन लेव्हल नियंत्रित करण्यात येत आहे़ तिन्ही कक्षात सर्वच ठिकाणी आॅक्सिजन देण्याची सोय असल्याने गंभीर रुग्णांवर उपचार करणे सोपे झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे़येत्या काळात महिला रुग्णालयाच्या इमारतीतही व्हेंटीलेटर आणि आॅक्सिजन बेडची व्यवस्था होणार असल्याने मृत्यूदरावर मात करणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ गंभीर रुग्णांच्या शरीरातील आॅक्सिजन नियंत्रित करण्यासाठी दर दिवसाला किमान २० पेक्षा अधिक जंबो सिलींडर या वॉर्डांमध्ये वापरात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़४जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात सध्या ४१ जणांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातील २६ हे आयसीयू कक्षात आणि उर्वरि रुग्ण हे नर्सिंग कॉलेजमध्ये शिफ्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ या रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकारी आणि जीएनएम यांचे एक पथक याठिकाणी तैनात करण्यात आले आहे़ श्वास घेण्यास अडचण आल्यावरच त्यांना व्हेंटीलेटर दिले जात आहे़
गरज असलेल्यांना तातडीने आॅक्सिजनची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:25 IST