शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची अवैध वाहतूक करणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 12:20 IST

24 तासात दुसरी कारवाई : मोलगी परिसरात टोळी कार्यरत असल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : मोलगी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी अक्कलकुवा येथे जीपमधून आठ गायींना बांधून घेऊन जात असताना साकलीउमर गावाजवळील चौफुलीवर सापळा रचून पकडले. या वेळी सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला 24 तास उलटत नाही तोवर दुस:या जीपला सात गायींची अवैधरित्या वाहतूक करताना पकडले. त्यामुळे महाराष्ट्र-गुजरात व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील अवैध गुरे वाहतूक करून त्यांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणा:यांचे धाबे दणाणले आहेत.शुक्रवारच्या घटनेत एमएच 11 - टी 7326 या गाडीला आठ गायींसह पकडले. या वेळी मागावून येणा:या दुसरी गाडी क्रमांक एमएच 04- ईबी 1850 च्या चालकाने पोलिसांना पाहून सर्व वाहनातील सर्व गुरे अंधाराचा फायदा घेत सोडून देत घटना स्थळावरून पळून गेला. दरम्यान मोलगी पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करूं फरार गाडीचा मागोवा काढण्यासाठी अथक परिश्रम घेवून खडा पहारा ठेवला.या वेळी पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, फौजदार दीपक बागुल, हवालदार मोतीलाल घमंडे, पो.काँ.संतोष राठोड, पो.काँ.संतोष तावडे, पो.काँ.कल्पेश कर्णकार, अमोल शिरसाठ, वाहनचालक राजकुमार जाधव यांच्या पथकास पुन्हा गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी फारार गाडी पुन्हा नव्याने सात गायींची वाहतूक करताना उखली, बोरवाडी, भोरकुंड, साकलीउमर मार्गे अक्कलकुव्याकडे जात असताना आटय़ाबारी गावालगतच्या बसथांबा जवळ गाडी क्रमांक एमएच 04-ईबी 1850 हीला सकाळी साडे सात वाजता पोलिसांनी अडविले. या वेळी चालकाने गाडी थांबवून साथीदारांसह पळ काढला असता पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर काही वेळाने एक इसम गाडीजवळ आला असता त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी त्याने त्याचे नाव ईश्वर भांगा पाडवी (20) रा.जुनवानी, ता.अक्कलकुवा असे सांगितले. तसेच मी गाडीचा मालक असून, माङयाकडून सलमान नामक इसमाने गाडी दोन हजार रुपय भाडय़ाने घेतली. याप्रसंगी त्याने सांगितले की, पिंपळखुंटा, रोहणीबारीपाडा येथून गुरे भरून अक्कलकुवा येथे नेणार आहे.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून संबंधित इसमास गाडी व जणावरांसह मोलगी पोलीस ठाण्यात आणून ताब्यात घेतले. या वेळी 34 हजार 500 रुपयांच्या सात गायी, एक लाख 50 हजार रुपये किमतीची जीप, असा एकूण एक लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयितास ताब्यात घेतले.सलग दोन दिवसापासून अवैधरित्या गुरांची वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आहे. या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या गुरांना ग्रामस्थ व पोलिसांनी चारा, पाण्याची व्यवस्था करून देत त्यांची सेवा करीत आहेत