शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या नावाने गुजरातमधून हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:38 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. तापी नदीतील वाळू ही बांधकामासाठी उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे या वाळूला थेट विदेशातही मागणी आहे. त्यामुळे येथील वाळूचे ठेके घेण्यासाठी अनेक बडय़ा मान्यवरांची स्पर्धा असते. यावर्षी देखील डिसेंबर 2017 मध्ये जिल्ह्यातील चार वाळू ठेक्यांचा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गतच सावळदा येथील वाळू घाटही मंजूर करण्यात आला आहे. सावळदा हे गाव गुजरातच्या हद्दीवरच आहे. दुसरीकडे गुजरातमध्येही तापी नदीवरच व्यावल, अंतुर्ली, निझर येथे ठेके देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सावळदा घाटावर वाळूची उपलब्धता समाधानकारक नाही. असे असतांनाही गुजरातच्या ठेकेदाराने सावळदाच्या नावावर हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची मध्यंतरी स्थानिक प्रशासनाने दखल घेवून पंचनामेही केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, तहसीलदारांनी वस्तूस्थिती लक्षात घेवून सावळदा येथील ठेका रद्द करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाला कळविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, दुसरीकडे वाका चौफुलीपासून तर व्यावलर्पयत मुख्य रस्त्यावरून प्रवास केल्यास या भागात लाखो ब्रास वाळूचे ढिगारे दिसून येतात. वाका चार रस्ता ते नंदुरबार तसेच वाका चार रस्ता ते प्रकाशा या रस्त्यावर रोज शेकडो वाळूचे डंपर ये-जा करतांना दिसतात. विशेष म्हणजे ही वाहतूक करतांना नियमाचे पालन होत नाही. वाहनातील वाळू झाकली जात नसल्याने ती वाळू उडते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना त्याचा प्रचंड फटका बसतो. रस्त्यावरच मोठय़ा प्रमाणावर वाळू पसरत असल्याने वाहनेही त्यावरून घसरतात त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच कारणाने एका दुचाकी चालकाचा मृत्यू   झाला.   रोज दिवसाढवळ्या राजरोसपणे वाळूची ही तस्करी सुरू असतांना त्याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषत: वाळू वाहनांमुळे वाहनधारकांचे होणारे हाल आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाळू माफियांची मुजोरी वाढली असून अधिका:यांना धमकवणे, त्यांचे अपहरणाचे प्रकारही घडले असून याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी देखील आहेत. असे असतांनाही या माफियांवर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे.