प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार तालुकाप्रमुख योगेश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शासनाने एसटी बसची सेवा सुरू केलेली होती, परंतु कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालय, कॉलेज व सर्व दळण-वळण बंद झाल्यामुळे एसटी महामंडळानेही बसफेऱ्या बंद केल्या होत्या, परंतु आता कोविड १९चा प्रादुर्भाव कमी झालेला असून, जनजीवन पूर्वपदावर येऊन शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पूर्ववत सुरू झालेले आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थी ग्रामीण भागातून नंदुरबार शहरात किंवा ग्रामीण भागातीलच इतर गावांना शिक्षणासाठी ये-जा करत असतात. परंतु मानव विकास मिशनअंतर्गत बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना खासगी प्रवासी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी संपूर्ण नंदुरबार तालुक्यात बसफेऱ्या पूर्ववत तत्काळ सुरू करण्यात याव्यात. तत्काळ बसफेऱ्या सुरू न केल्यास प्रहार शेतकरी संघटना एसटी महामंडळाच्या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशाराही शेवटी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, जिल्हा सरचिटणीस सावळीराम करे, नंदुरबार तालुकाध्यक्ष योगेश पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ सेवक बारकुदादा शिरोळे, शामा दामा ठेलारी आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू न केल्यास प्रहार संघटना आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST