शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

जिल्ह्याबाहेरुन कोणी आल्यास गुन्हे दाखल करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून लगतच्या गुजरात, मध्यप्रदेश राज्यासह परजिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून लगतच्या गुजरात, मध्यप्रदेश राज्यासह परजिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना येथील नागरिक आणण्याचा प्रयत्न करत आहेत़ तसे केल्यास येथे येणाऱ्यांसह त्यांना आणणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिला़ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्याची माहिती दिली़यावेळी निवासी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये उपस्थित होते़ पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही़ दुसºया टप्प्याला सुरुवात झाली आहे़ यात सीमावर्ती भागात २२ चेकपोस्ट तयार केल्या आहेत़ या चेकपोस्टवर करडी नजर ठेवली जाणार आहे़ नागरिकांनी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने बाहेरगावाहून नातेवाईकांना आणून संसर्ग होईल अशी स्थिती निर्माण करुन नये, प्रशासन गांभिर्याने त्यावर लक्ष ठेवून आहे़ बाहेरुन कोणाला आणल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई होईल़ जिल्ह्यात कोरोनासोबत उष्णतेतही वाढ आहे़ तापमानाचा पारा हा ४२ अंशापर्यंत गेला आहे़ या काळात सिमावर्ती भागात तयार करण्यात आलेल्या २२ चेकपोस्टवर तैनात केलेले पोलीस, आरोग्य, प्रादेशिक परिवहन आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांसाठी सोयी सुविधा देण्याची जबाबदारी ही त्या ग्रामपंचायती आणि नगरपालिका यांची राहणार आहे़ पथकांच्या बैठकीसाठी तंबू, पिण्याचे पाणी, हँडवॉश सॅनेटायझरची व्यवस्थाही करुन द्यायची आहे़ तशा सूचना ग्रामपंचायतींना करण्यात येत आहे़शेवटी त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सात क्वारंटाईन कक्षांतून आतापर्यंत २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ उर्वरित १०३ नागरिकांतही कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांची देखभाल करुन परत पाठवले जाईल़ २१ तारखेपर्यंत जिल्ह्यात काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन करण्यावर भर राहणार आहे़२१ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे़ २१ नंतर काही ठिकाणी शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कामकाज सुरु होणार आहे़बुधवारी गुजरात, मध्यप्रदेश तसेच धुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या २२ चेकपोस्टवर थर्मल स्कॅनर देण्यात येणार आहेत़ या स्कॅनरसोबत आरोग्य, पोलीस आणि आरटीओच्या कर्मचाºयांना एन ९५ मास्क, पीपीई कीटचा पुरवठा करण्यात येणार आहे़जिल्ह्यातील सात क्वारंटाईन कक्षात सध्या १०३ जणांना ठेवण्यात आले आहे़ नंदुरबार २५, नवापुर ३९, तळोदा ११, शहादा १० तर अक्कलकुवा येथील कक्षात १८ जणांना दाखल करण्यात आले आहे़ या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या अखत्यारितील क्वारंटांईन कक्षांसाठी ३११ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ येत्या काळात जिल्हा प्रशासनाला १० व्हेंटीलेटर मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी दिली आहे़ आरोग्य विभागाकडे पीपीई कीट आणि एन९५ मास्क हे हजारांच्या संख्येत उपलब्ध असल्याने कामकाज योग्य पद्धतीने सुरु आहे़मध्यप्रदेशातील बडवानी येथे १७, गुजरात राज्यातील सुरत येथे ४२, धुळे जिल्ह्यात २ तर मालेगाव येथे २७ रुग्ण आढळून आल्याने नंदुरबार जिल्हा संवेदनशील बनला आहे़ या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले़केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील लॉकडाऊनचे मूल्यमापन होणार आहे़ यात जिल्हा ग्रीन झोनमध्ये काय राहिल्यास संचारबंदीतून शिथिलता मिळण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी वर्तवली़लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील गोरगरीबांना अडचणी येऊ नयेत यासाठी १ हजार ६१ स्वस्त धान्य दुकानातून आतापर्यंत ८२ टक्के धान्य वाटप पूर्ण झाले आहे़सीमावर्ती भागातील १६१ गावांमध्ये १६१ ग्राम सुरक्षा दल स्थापन झाले असून त्यांचे कामकाज सुरु झाले आहे़जिल्ह्यात काही खाजगी डॉक्टर अद्यापही कोरोनाचे कारण देत उपचार करण्याबाबत नकारात्मक पवित्रा घेत आहेत़ रुग्णांची सेवा सुरु ठेवणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे़ कर्तव्यात कसूर करणाºया खाजगी डॉक्टरचा वैद्यकीय परवाना कायमस्वरुपी निलंबित करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे़आतापर्यंत जिल्ह्यात २४ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आल्याची माहितीही प्रसंगी देण्यात आली़ त्यांच्यावर पथकांची नजर असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़