रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचित्रपट आणि टिव्ही सिरीअल मधील कलाकारांबाबत खूप उत्सूकता होती. ते कसे राहत असतील, कसे बोलतात, शुटींग कशी होते अशा अनेक बाबींचे आकर्षण वाटत होते. पण नशिबाने याच क्षेत्रातील एक मित्र मिळाला आणि त्याने ही सर्व उत्सूकताच पुर्ण केली. शुटींग पहाण्याची इच्छा त्याच्याजवळ व्यक्त केली तेंव्हा त्याने ते पहाण्याचे निमंत्रण दिले सोबत सिरिअल मधील एक रोलही माङयाकडून करून घेतला. त्यामुळे शुटींग पहायला गेलो आणि हिरोच बनून आलो.. प्रश्न : आजवर आपण कुठल्या सिरिअलमध्ये रोल केले आहेत? उत्तर : मी रेल्वेत नोकरी करतो. त्यामुळे नोकरी हे माङो पहिले प्राधान्य आहे. कलाकार आणि चित्रपटाबाबत माझा छंद आहे. हा छंद नोकरी सांभाळून जपावा लागतो. चित्रपट क्षेत्रातील एका मित्रामुळे मला माझा छंद जोपासण्याची संधी मिळाली आणि काही मोजक्या सिरीअलमध्ये काम करता आले. विशेषत: राशीविला व सावधान प्यार मे या दोन सिरिअलमध्ये काही भागात मी काम केले आहे. प्रश्न : सिरीअलमध्ये कामाचा पहिला अनुभव कसा राहिला आणि त्यात संधी कशी मिळाली?उत्तर : सुरुवातीला मला चित्रपटातील कलाकारांबाबत खूप आकर्षण होते. जेंव्हाही चित्रपट अथवा टिव्ही पहायचो तेंव्हा वाटायचे ही शुटींग कशी होत असेल. कलाकार कसे राहत असतील. त्यांचे बोलणे, वागणे याबाबत उत्सूकता वाटत होती. त्यामुळे एकदा तरी आपण शुटींग पहावी अशी इच्छा होती. ही इच्छा आपण आपल्या कुटूंबियांशीही बोलून दाखविली होती. एकदिवशी असाच कामानिमित्ताने पूर्वी रेल्वेशीच संबधीत असलेल्या लवसिंग ठाकूर या मित्राशी भेट झाली. ते चित्रपट आणि सिरिअलमध्ये कथा लेखनाचे काम करतात. त्यांच्याकडून त्याबाबत ऐकल्यानंतर त्यांच्याजवळच आपण शुटींग कसे होते ते पहायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आणि स्वप्न वास्तव्यात आले. शुटींग पाहण्याऐवजी रोलच करायला मिळाला.एका मेसेजने झाले स्वप्न पुर्णलवसिंग ठाकूर या कथा लेखकाचा एका रात्री मेसेज आला. उद्या शुटींग पहायला ये. आपण कुटूंबासह गेलो आणि तेथे त्याने चक्क सिरिअलमध्येच रोल करायला सांगितले. राशिविला या सिरिअलमध्ये कंपांऊडरचा रोल त्यांनी दिला. तेंव्हा सर्व अद्भूत वाटत होते. आणि हे काम आपल्याला करता येईल का? याची भितीही होती पण ते सर्व दूर झाले. आणि आपल्यातला सुप्त कलाकार जिवंत झाला.कलाकारांशी मैत्रीआधी ज्यांच्याबद्दल खूप आकर्षण होते त्यातील अनेकजण मित्र झाले. सुटीच्या दिवशी आपण या मित्र परिवारात जात असतो. तारक मेहता, भाभीजी घर पे है या सारख्या सिरिअलमधील सर्व कलाकार ओळखीचे आहेत. अलीखॉ यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चनसह अनेक बडय़ा कलाकारांच्या सहवासही मिळाला. आपल्या बरोबरच मुलगा महेश यालाही कामाची संधी मिळाली.
शुटींग पहायला गेलो अन् हिरो बनून आलो.. रेल्वेचे टी.टी.शिवाजी रामजी बैनवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:45 IST