नंदुरबार : कोलकाता येथील कोरोना रुग्णाचा हावडा एक्सप्रेसमध्ये मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकावर ही रेल्वे आल्यानंतर निदर्शनास आली. दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकावर अधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णासोबत प्रवास करणाऱ्या महिलेच्या मदतीला धाऊन आले.
कोलकाता येथील आनंद कोदाड (४२)हे अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने पत्नी व दोन लहान मुलांसोबत प्रवास करीत होते. रेल्वे सकाळी साडेसात वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकात पोहचली त्यावेळी अचानक आनंद यांची पत्नी पतीची प्रकृती खालावल्याबाबत मदतीची हाक देत होती. त्यावेळी रेल्वे स्थानकावरील अधिकारी व काही कार्यकर्ते मदतीला धाऊन आले व त्यापरिवाराला रेल्वेतून खाली उतरवून घेतले. व उपचार करण्यात आले. मात्र आनंद यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संबधीत महिलेला सर्व प्रकारची मदत नंदुरबारच्या कार्यकर्त्यांनी केली.