शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अश्व स्पर्धांनी वेधले अश्वशौकीनांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व स्पर्धांना गुरुवारी प्रारंभ झाला. गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व स्पर्धांना गुरुवारी प्रारंभ झाला. गुरुवारी अदंत मादी-नर, दोन दात मादी-नर स्पर्धा झाली. २५ डिसेंबरपर्यंत विविध अश्व स्पर्धा होणार आहेत.चेतक फेस्टीवल समितीमार्फत आयोजित विविध कार्यक्रम व स्पर्धांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बुधवारी रात्री लहान मुलांसाठी आयोजित कार्यक्रमाने धमाल केली. महिला-पुरुषांसह बालगोपालांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात कलाकारांनी मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या पबजी खेळामुळे विद्यार्थ्यांची होणारी दुर्दशा व दुष्परिणामावर आधारित नाटक सादर केले. या नाटकाचे सादरीकरण रमेश वारंग, आकाश भागवत, ललीत धारुनकर, संजय गवार, शौर्य यादव, कृतिका सोहोनी, पवन लवाड, करण पवार, शितल शिंदे व क्षितिया कदम यांनी केले. नाटकातील बालकलाकारांनी अक्षरश: धमाल उडवत प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकात विनोदाचीही मेजवानी होती.गुरुवारपासून विविध अश्व स्पर्धांना प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी झालेल्या अदंत नर व दोन दात नर या गटात ३५ स्पर्धक घोडे सहभागी झाले. त्यात प्रथम क्रमांक इमरान शेख (नाशिक) यांचा ‘गुलजार’ घोडा, द्वितीय रामसिंग (मध्य प्रदेश) यांचा ‘शेरु’ तर तृतीय क्रमांक मोहंमद यामीन (उत्तर प्रदेश) यांच्या ‘शेरा’ घोड्याने पटकावला. ५१, ३१ व २१ हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. स्वतंत्र मोठा नर स्पर्धेतही ३५ घोडे मालकांनी सहभाग घेतला. त्यात हरदेवसिंग (राजस्थान) यांचा ‘शक्ती’ प्रथम, फैजल बिन महेफूज (हैद्राबाद) यांचा ‘राजू’ द्वितीय तर तळेगावचे रवींद्र निकम यांच्या ‘राजवीर’ घोड्याने तृतीय क्रमांक मिळविला. स्वतंत्र मादी गटात ४० घोडींचा समावेश होता. त्यात मोहंमद फारुख (मध्य प्रदेश) यांची ‘रश्क’ घोडी प्रथम, दिपूभाई (मध्य प्रदेश) यांची ‘रेशमा’ द्वितीय तर मध्य प्रदेशातील रुपेश पाटीदार यांच्या ‘सलोनी’ या घोडीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या घोडी मालकांना अनुक्रमे ७१, ५१, ३१ रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिनह देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.सामूहिक दोन दंत मादी व अदंत मादी या स्पर्धेत ३५ घोडी मालकांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक महू (मध्य प्रदेश) येथील मोहंमद शाहरुख यांची ‘बर्क’, द्वितीय इंदूर येथील इर्शाद कुरेशी यांच्या ‘नुरी’ने तर तृतीय क्रमांक इंदूर येथील रुपेश पाटीदार यांच्या ‘सुंदरी’ घोडीने पटकावला. अनुक्रमे ५१, ३१ व २१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. परीक्षक म्हणून सुखविंदर सिंदू (पंजाब), अजित मंदार (रोहतक, हरियाणा), विकास बोयनकर (महाराष्टÑ), डॉ.विजय काशीद (दिल्ली) यांनी काम पाहिले. घोडा व घोडींचे वय, उंची, जात, लक्षणे, आरोग्य तपासणी, रंग, देखणा, रुबाबदार ही लक्षणे पाहून परीक्षणातून विजेते घोडे व घोडींची निवड करण्यात आल्याचे परीक्षकांनी सांगितले. या वेळी चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, प्रणवराज रावल, रणवीर रावल, जयेश पेकळे, मनू शर्मा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले. स्पर्धेचे नियोजन महेंद्र गिरासे, एकनाथ गिरासे, विवेक वाडिले, विनोद तावडे, अजय पाटील, संदीप जमादार यांनी केले होते. शुक्रवारी ‘काठेयावाडी’ अदंत मादी व नर, मोठा नर व मादी आदी अश्व स्पर्धा होणार आहेत.४सारंगखेडा यात्रेत भरलेल्या घोडेबाजारात गुरुवारी ४७ घोड्यांची विक्री झाली. त्यातून २३ लाख सहा हजार रुपयांची उलाढाल झाली. आजअखेर ६३८ घोड्यांची विक्री होऊन दोन कोटी ४७ लाख १० हजार ९०० रुपयांची उलाढाल झाली आहे.४अश्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशातील विविध भागातून घोडे दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी घोडे मालक घोड्यांकडून सराव करून घेत आहेत. घोड्यांचा सराव पाहण्यासाठीही यात्रेकरुंची मोठी गर्दी होत आहे. रात्रीही घोडे मालक आपल्या घोड्यांकडून सराव करुन घेत आहेत. हा सराव पाहण्यासाठीही घोडे मैदानावर अश्वशौकीनांची गर्दी होत आहे.