घोडेबाजार तीन दिवसातच एक कोटीच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:30 PM2019-12-15T12:30:25+5:302019-12-15T12:30:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता़ १० दिवसांच्या ...

Horse market ahead of one crore within three days | घोडेबाजार तीन दिवसातच एक कोटीच्या पुढे

घोडेबाजार तीन दिवसातच एक कोटीच्या पुढे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता़ १० दिवसांच्या यात्रोत्सवातील घोडेबाजारात अवघ्या तीनच दिवसात १ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे़ बाजारात यंदा दोन हजार घोड्यांची आवक झाली आहे़
घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सांरगखेडा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही चेतक फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे़ यांतर्गत शनिवारअखेरीस ५४ घोड्यांची विक्री करण्यात आली़ यातून २२ लाख ५२ हजार रुपयांची उलाढाल झाली़ या उलाढालीनंतर १ कोटी ९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे़ बाजारात नुकरा जातीच्या घोड्यांची सर्वाधिक आवक झाली असून या घोड्यांच्या खरेदीसाठी देशभरातून खरेदीदार सध्या सारंगखेड्यात येत आहेत़ सायंकाळपर्यंत याठिकाणी १ कोटी ९ लाख २४ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे़
शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटीचे असल्याने राज्यासह देशातील विविध भागातून अश्वप्रेमी येथे दाखल झाले होते़ यात ६८ इंच उंची असलेला राजवीर, ६५ इंच उंचीचा बादल आणि ५० लाख रुपये किमत असलेला सुलतानची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक येथे हजेरी लावत होते़ दिवसभरात घोड्यांच्या शर्यतींनी रंगत आणली होती़


५५ लाखाचा बादल वेधतोय लक्ष
सारंगखेडा येथील घोडेबाजार हा महागड्या अशा पंचकल्याणी घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे़ याठिकाणी भडगाव जि़ जळगाव येथील एका व्यापाऱ्याने ५५ लाख रुपये किमतीचा बादल हा घोडा विक्रीसाठी आणला आहे़ तब्बल ६५ इंच उंची असलेला हा घोडा सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे़ त्याची अद्याप खरेदी झालेली नाही़ परंतू त्याचा वेगळा आहार, नृत्य कौशल्य आणि धावण्याचे कसब पाहण्यासाठीच अश्वप्रेमी गर्दी करत आहेत़ त्याच्या ऊस्तादाकडून त्याची खास निगा राखली जात असल्याचे सांगण्यात आले़

नुकरा घोड्यांना सर्वाधिक पसंती
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात मारवाड, पंजाब, काठियावाडी या प्रजातीचे घोडे दाखल झाले आहेत़ तिन्ही प्रजातींच्या घोड्यांना खरेदीदारांची विशेष पसंती असते़ यातही पंजाब प्रांतातून येणाºया ‘नुकरा’ या घोड्याला विशेष मागणी असते़ याठिकाणी नुकरा घोडे घेण्यासाठी खरेदीदार हजेरी लावून त्याची खरेदी करतात़ बाजारात ६७ इंची उंची असलेला राजवीर या घोड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे़ मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील व्यापाºयाने विक्रीसाठी आणलेल्या या घोड्याला दररोज पाच लीटर दूध, दोन किलो चनाडाळ, अंडी असा आहार द्यावा लागतो़ घोड्याच्या देखभालीसाठी तब्बल आठ लोकांचे पथक असून त्यांच्याकडून त्याची निगा राखली जात आहे़ बाजारात खरेदीदारांपेक्षा पाहणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी होत असल्याचे चित्र आहे़ शनिवारी ६० हजार भाविक, पर्यटक यांनी सारंगखेडा यात्रोत्सवात हजेरी लावल्याची माहिती असून रविवारी ही संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे़

Web Title: Horse market ahead of one crore within three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.