शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सातपुड्यातील होलीकोत्सवास आज पासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. यानिमित्त दु:खावर पडदा पाडत असून अनेक संकटे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. यानिमित्त दु:खावर पडदा पाडत असून अनेक संकटे विसरुन आदिवासी बांधवांकडून आनंदाचा शोध घेतला जात आहे. गावाबाहेर गेलेली मंडळी मूळगावी परतले आहे. सर्वांच्या सहभागाने होळी गीते सुर धरु लागली तर गावागावात होळीनृत्यही फेर धरु लागले आहे. त्यामधूून निसर्ग नियमांवर आधारित जीवन पद्धती व जीवनमूल्ये मांडली जात आहे.सादर होणारी गीते सातपुड्यातील आदिवासींना सुखसमृद्धीचा संदेश देत आहे. व्रत पाळणाऱ्या कलाकारांनी देखील त्यांना लागणाºया साहित्यांची जुडवा-जुडव करीत सहभाग नोंदवित आहे. होळीतील प्रमुख आकर्षण ठरणाºया मोरखीला डोक्यावर मोरपीसे, कमरेला बांधण्यासाठी पितळी घुंगरु, वाजविण्यासाठी खाट (माठाच्या काठेवर चामडे बांधलेले वाद्य). बावा या कलाकारास बांबूपासून निर्मित सजवलेला टोप, कमरेला बांधण्यासाठी दुधी भोपळे, लाकडी तलवारी, दोन्ही खांद्यावरुन छाती-पाठीवर गोलाकार स्वरुपात व दोन्ही हाताच्या मनगटावर बांधण्यासाठी पिंपळवर्गिय फळ (खोंदे) फळांची माळ, दोन्ही पायात बांधण्यासाठी छोटे धुंगरु तर ढाणका डोकोअं यास परकर व ब्लाऊज, एका हातात बांबूपासून निर्मित सुपडी, लाकडी मोठा चमचा (साटा), मोरावाल्याला धनुष्य, बाण व पाठीमागून कमरेला बांधण्यासाठी एक घुंगरू आदी तर प्रत्येकाला हातात व गळ्यात परिधान करायला चांदिचे दागिने साहित्य शिवाय स्वत:च्या चादरी, कपडेलत्ते देखील आवश्यक असते. त्यानुसार त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे.आदिवासी देव-देवतांची भूमी असलेल्या मोरी राही (डाब, ता.अक्कलकुवा) येथे दि.५ मार्च रोजी संपूर्ण आदिवासींच्या साक्षीने देवाने सुरू केलेली होळी साजरी करण्यात येणार आहे. दि. ६ रोजी डाब ग्रामस्थ व धडगाव तालुक्यातील काकरपाटी, बोदला, खांडबारा, खेतीया (मध्यप्रदेश) येथील होळी साजरी करण्यात येणार आहे. असे नियोजित तारखेनुसार प्रत्येक गावांची होळी साजरी होणार आहे. प्रत्येक गावाची होळी ही पहाटे पहिला कोंबडा आरवताच होळी पेटवली जाणार आहे.प्रत्येक गावाच्या होळीत अनेक ढोल दाखल होणार असून ढोलवर पहिली थाप पडताच महिला-पुरुष परंपरेनुसार नृत्यांचा फेर धरतील. रात्रभर नाच-गाणे सादर करीत वर्षभरातील दु:ख, असंख्य संकटांवर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे.होळी पेटल्यानंतर सकाळी बाहेरगावाहून आलेले बंधू-भगिनी, मोरखी (कलाकार), ढोल वादक-मालक यांची भोजन व अन्य सुविधा पंपरेनुसार ग्रामस्थांच्या एकजुटीने करण्यात येईल. सकाळी ११ वाजेपासून पुन्हा मेलादा (एकप्रकारची यात्रा) सुरू होईल. पोलीस पाटलांच्या घरी पूजा करून सर्वांच्या साक्षीने सायंकाळपर्यंत अखंड मेला (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. अन् त्या -त्या गावातील होळीचा निरोप घेतला जाईल. निरोप घेतानाच पुन्हा दुसºया गावातील होळीसाठी पुन्हा सात वाजेपर्यंत त्या-त्या गावात हे आदिवासी बांधव पोहोचतील, तेथेही परंपरेनुसारच हाळी साजरी होईल.