शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

सोशल मीडियावर होळीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यात होळीला सुरुवात झाली असून यानिमित भ्रमणध्वनीसह व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावरही आदिवासी तरुणांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यात होळीला सुरुवात झाली असून यानिमित भ्रमणध्वनीसह व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावरही आदिवासी तरुणांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे.आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दु:खे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते आहे. सर्वांना एकत्र करुन समुहजीवनाचे धडे देते.होळीमुळे सातपुड्यातल्या आश्रमशाळा, शाळा ओस पडण्याची शक्यता आहे. वसतीगृहात राहून शिकणारी आदिवासी मुले गावाकडे परतली आहे. या मुलांची पावले न चुकता होळीसाठी वाजणाऱ्या डोलच्या तालावर थिरकणार आहे. होळीत किमान २०० ते ३०० ढोल, मोरखी-बावा यांची १५ ते २० हजाराची गर्दी आणि साथीत बेधूंद होऊन नाचणारी लाखो बांधवांची प्रत्येक होळीत उपस्थिती राहणार आहे.रात्रभर होणारी होळीगीते व आदिम नृत्य. रात्रीच्या अंधार-उजेळात येथे ना कधी स्त्रिायांची छेडखानी होते ना कोणतीही हाणामारी. सर्व कसे एकमेकांत मिळून- मिसळून जातात. समता पर्व गाणारी ही होळी रात्रभर स्त्रिा-पुरुष एकत्र येऊन साजरी करणार आहेत. ही बाब आदिवासींच्या समुह जीवन दर्शवून जाते.