शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात; पहिली मानाची होळी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 19:25 IST

सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. 

रमाकांत पाटील

नंदुरबार:  सातपुड्यातील मानाची होळी असलेली  डाबचा (हेलो दाब)मोरी राही पाडा येथील  देवाची होळी आज दिनांक 3 रोजी शुक्रवारी पहाटे पारंपारिक नृत्य करीत विधिवत   पूजन करून  पेटविण्यात आली. सर्वप्रथम मान असलेली ही होळी पेटल्यानंतर सातपुड्याच्या होलीकोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 

सातपुड्यातील ही मानाची देव होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र गुजरात तसेच मध्य प्रदेशातून  मोठ्या प्रमाणावर  आदिवासी बांधव उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळपासूनच येथे पारंपारिक होळीची पाळणी अर्थात होळी साजरा करण्यासाठी पारंपारिक नियमांचे पालन करणाऱ्या विशिष्ट पारंपारिक वेशातील बावा, बुध्या, मोरखी,धानका,डोखा  यांचे नृत्य सुरू झाले होते. या पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर पहाटे गाव पुजारींच्या हस्ते विधिवत पूजन करून  देवाची होळी परंपरेनुसार चालत आलेल्या मानाप्रमाणे धनसिंग रूपसिंग पाडवी यांच्या हस्ते पेटविण्यात आली. डाब (मोरीराही) येथील हे देव होळी पेटल्यानंतर होळी आता सातपुड्यातील  होली कोतवाला सूरुवात होणार आहे. 

सातपुड्यात संपन्न होणाऱ्या होलिकोत्सवाच्या पाश्वभुमीवर नवस केलेच्या आदिवासी समुदायातील बांधवांकडून पाळणी सुरु करण्यात आली आहे .पादत्राणे न घालणे, खाटेवर न बसणे, सत्शील वर्तन ठेवणे, निंदा न करणे आदिम सह विविध नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. आरोग्य चांगले राहो, वरुण राजाची कृपादृष्टी होवो, चांगला पाऊस पडून शेती हिरवीगार होवो, धन,धान्य, वैभव. सुख,शांती,समृद्धी नांदावी यासाठी हा नवस केला जातो. 

डाब (मोरीराहीपाडा) येथील होळी सर्वप्रथम आदिवासींचे दैवत असलेल्या राजा- फांटा, गांडा -ठाकोर यांनी सर्वप्रथम यांनी साजरी केली होती त्यानंतर होळी पेटवण्याच्या दुसरा मान राजांना देण्यात आला व तिसरा मान प्रत्येक गावातील पोलीस पाटील (वावा) यांना मिळालेला आहे. या होळीसाठी सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिक डाब येथे बुधवारपासून दाखल झाले होते. याहामोगी देवीचे जन्मठिकाण असलेल्या देवगाई येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. डाबच्या देवहोळीनंतर वालंबा, तोडीकुंड, काठी यासह ठिकठिकाणी होळी पेटणार आहे. यात जागोजागी मोरखी,बुध्या, बावा, धानका, डोखा हे गेर नृत्य आदिवासींकडून केले जाणार आहे.

 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारHoliहोळी 2022