शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

काठीच्या राजवाडी होळीने लोकसंस्कृतीच्या रंगात रंगला ‘सातपुडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 12:41 IST

होलिकोत्सव : काठीच्या राजवाडी होळीला एक लाख नागरिकांची हजेरी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 :  ‘नैसर्गिक साधन संपत्तीची भरभराट होऊन विश्वाचे कल्याण होवो’, अशी प्रार्थना करत काठी ता़ अक्कलकुवा येथील राजवाडी होळी शुक्रवारी पहाटे पेटवण्यात आली़ तत्पूर्वी येथे रात्रभर लोकसंस्कृतीचा जागर झाला़ रात्रभर वाजणारे ढोल, मोरखी, बावा, बुध्या, ढाणका यांच्या कमरेला बांधलेल्या घुंगरू आणि तुंबडय़ांचा होणारा मधुर आवाज सातपुडय़ात दुमदुमत होता़  होलिकोत्सवात आमदार क़ेसी़ पाडवी, जिल्हाधिकारी  डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजीमंत्री पद्माकर वळवी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आशा पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत, पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे, माजी सभापती सी़क़ेपाडवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर  सहभागी झाले होत़े  सातपुडय़ाच्या दुर्गम भागात असलेल्या काठी येथे मानाची राजवाडी होळी पेटवण्याची परंपरा आह़े डाब (मोरीराही) येथील देवहोळीनंतर सातपुडय़ात  होळीला सुरूवात झाली होती़ शुक्रवारी पहाटे काठी येथील राजवाडी होळी पेटवण्यात आली़ तत्पूर्वी काठी येथील मुख्य होळी चौकात  होळीसाठी नवस करणारे मोरखी, बावा, बुध्या, ढाणका यांच्या पथकांनी ढोल, बिरी, बॅन्ड याच्या तालावर नृत्य केल़े डोक्यावर मोरपिस आणि कागदापासून तयार केलेला तुरा, त्यावर लायटिंग, अंगावर पांढरी नक्षी या वेशातील बावा आणि बुध्या यांच्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले, रात्रभर सुरू असलेल्या जल्लोषाचा समारोप पहाटे होळी पेटवून करण्यात आला़ होळी दर्शनानंतर नवस करणा:यांनी उपवास सोडल़ेगेल्या काही वर्षात लोकप्रिय होत असलेल्या काठीच्या पारंपरिक राजवाडी होळीसाठी मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाले होत़े धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यासह नाशिक, पुणे, सोलापूर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातील पर्यटक तसेच गुजरात, मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव आणि पर्यटक याठिकाणी हजर होत़े पर्यटक आणि आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी येथे पारंपरिक मेलादा उत्सव  भरवण्यात आला होता़ यात प्रामुख्याने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, फळे, पूजा साहित्य यासह खेळणीची दुकाने होती़ रात्रभर सुरू असलेल्या या उत्सवातून हजारो रूपयांची उलाढाल झाली़  रात्री उशिरार्पयत अक्कलकुवा व धडगाव मार्गाने पर्यटक खाजगी वाहनातून काठीकडे येत होत़े