निवेदनात, जनतेच्या समस्या खुल्यापणाने मांडता याव्यात, सोडवता याव्यात तसेच जनतेच्या वतीने विरोधी नगरसेवकांना सभागृहात बोलता यावे यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे प्रयोजन असते; परंतु कोविड नियमांचा कारण देत सर्वसाधारण सभा घेण्याचे सलगपणे टाळून नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी आणि त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे विरोधी पक्षाच्या व जनतेच्या अधिकारांची पायमल्ली करत आहेत. ३ सप्टेंबर रोजी नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कोविड नियमांचा गैरफायदा घेऊन ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यात कोविड संसर्ग होणार नाही याची दक्षता घेत व्यवहार सुरू आहेत. नंदुरबारातील शासकीय कार्यालये, बाजारपेठा सुरळीत चालल्या आहेत. तरीही नंदुरबार पालिका मात्र ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेत आहे.
सर्वसाधारण सभेत जनतेच्या वतीने प्रश्न मांडण्याचा अधिकार ऑनलाइन सभेच्या माध्यमातून डावलला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांना सर्वसाधारण सभा खुल्या वातावरणात घेण्यासाठी आदेश करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचे पालिका विरोधी पक्षनेते ॲड. चारुदत्त कळवणकर यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनावर नगरसेवक प्रशांत चाैधरी, नीलेश पाडवी, गाैरव चाैधरी, संगीता सोनवणे यांच्या सह्या आहेत.