शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात सोन्याचे दर सर्वाधिक

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: March 1, 2019 12:34 IST

व्यापार : भांडवली बाजारात अस्थिरता, भारत-पाक युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम

संतोष सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारत-पाकिस्तान सिमेवर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे व्यापार क्षेत्रात मोठी उलाढाल बघायला मिळत आहे़ सराफा बाजारात तेजी तर भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आहे़ खान्देशातील नंदुरबारात सोन्याच्या दरात सर्वाधिक तेजी दिसून येत आहे़ नंदुरबारात सोन्याचे भाव ३४ हजार रुपये प्रती दहा ग्रॅमपर्यंत जाऊन पोहचले आहेत़ तसेच चांदीदेखील किलो मागे ४१ हजार रुपयांपर्यंत गेली आहे़भारत-पाक सिमेवर अशीच युध्दजन्य परिस्थिती राहिल्यास सोन्याच्या भावात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ नंदुरबारच्या तुलनेत जळगावात प्रती १० ग्रॅम सोन्यामागे ३३ हजार ७०० व धुळ्यात ३३ हजार ३०० इतका भाव आहे़ त्यामुळे खान्देशात नंदुरबार येथे सोने सर्वाधिक महाग असल्याचे सांगण्यात आले आहे़ शेअर मार्केट मंदीत असला तरी नंदुरबार येथील सुवर्ण बाजार चांगलाच तेजीत बघायला मिळत आहे़ गुरुवारी सेंन्सेक्स व निफ्टीच्या निर्देशांकाता मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले़ गेल्या पंधरा दिवसांपासून हीच स्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे़रुपयाची स्थिती भक्कम होणारभांडवली बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये रुपयाची स्थिती अधिक भक्कम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ सध्या ७१ रुपयांच्या बरोबरीला १ डॉलर असे सूत्र आहे़ या आधीही ६६ रुपयांपर्यंत रुपयोचे ेअवमूल्यन झालेले होते़ त्या तुलनेत सध्या रुपया स्थिरावला असल्याचे सांगण्यात आले़ भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्व व्यवहार हे डॉलरच्या माध्यमातून होत असल्याने या कंपन्यांच्या दृष्टीने डॉलरची स्थिती मजबूत होणे व रुपयाचे अवमूल्यन होणे फायदेशीर ठरत असते़ सध्या रुपया स्थिर असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून बाहेरील गुंतवणूक क्षेत्रांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ भारत-पाकिस्तानात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने परकीय गुंतवणूकदारांकडून आपले शेअरर्स तसेच भांडवली बाजारातील आपली भागिदारी इतरत्र वळविण्यात येत आहे़ त्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या देशातील परकीय चलनावर होताना दिसून येत असतो़ त्यामुळे जोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता दूर होत नाही तोपर्यंत भारतातील भांडवली बाजारपेठेत स्थिरता निर्माण होणार नाही़भारतातील आगामी लोकसभा निवडणुका, भारत-पाकिस्तान संबंध तसेच अमेरिकेने अफगाणिस्तान येथून आपले सैन्य माघारी बोलावून तालिबानी संघटनांशी चर्चा करण्यासाठी टाकलेले पाऊल, अमेरिका व चीन या दोन मोठ्या देशांमध्ये व्यापारी कुरघोडी आदींमुळे व्यापार विश्वास मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे़ १४ फेबु्रवारी रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेन्सेंक्सच्या निर्देशांकात मोठी घसरण बघायला मिळत आहे़तेव्हापासून तर आतापर्यत बाजारात अस्थिरता कायम आहे़ यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास याचा फायदा भारतातील आयटी कंपन्यांना मिळणार आहे़ आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका शेअर मार्केटला बसला असला तरी सराफा बाजारात मात्र सर्व ठिकाणी झळाळी दिसून येत आहे़ साधारणत: लोकसभा निवडणुकीपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याचे सराफ बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़केंद्र शासनाकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातही व्यापारी वर्गाची निराशा झालेली आहे़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत भावात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, क्रुड आॅईलचे दर प्रती बॅरल साधारणत: ६० डॉलरपर्यंत गेले आहे़ त्यामुळे सोन्याच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे़४गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता सेन्सेक्स निर्देशांक ३६,०२५.७२ वर ओपन झाला होता़ संपूर्ण दिवस पडझड झाल्यानंतर दुपारअखेपर्यंत तो ३५,८६७.४४ वर स्थिरावल्याचे दिसून आले़४बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सेन्सेक्समध्ये -३७.९९ म्हणजे साधारणत ०.११ टक्के इतकी घसरण दिसून आली़ दरम्यान, सुरुवातीला उसळलेला निफ्टी निर्देशांक बाजार बंद होताना गडगडल्याचे दिसून आले़४बुधवारी १०,८०६.६५ वर बंद झालेला निफ्टी निर्देशांक गुरुवारी बाजाराची सुरुवात होताच १०,८६५.७० वर होता़ त्यानंतर दिवसभरात परदेशी गुंतवणूकदारांच्या बाजारातील उठाठेवीनंतर दुपारी साडेतीन वाजता निफ्टी निर्देशांक १०,७९२.५० पर्यंत खाली येत स्थिरावला़