लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील दसरा मैदान परिसरात दोन संशयीतांकडून गावठी पिस्तुल व सहा काडतूस पोलिसांनी जप्त केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी घडली. रामलाल लालदास वळवी असे संशयीताचे नाव आहे. दुसरा संशयीत अल्पवयीन आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नंदुरबार शहरात दोन व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तुल व काडतुसे घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिका:यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथक गस्त घालत असतांना साक्री नाका परिसरात दसरा मैदानाच्या बाजुला हे दोन्ही संशयित व्यक्ती फिरत असल्याचे दिसून आले. त्यांची चौकशी करून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतूस मिळाले. 25 हजाराची गावठी पिस्तुल व काडतुस जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार प्रदीप राजपूत, प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, संदीप लांडगे, मोहन ढमढेरे, किरण मोरे यांनी केली.
नंदुरबारात गावठी पिस्तूल व काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:22 IST