शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

शिक्षणेतर कामांमुळे मुख्याध्यापकांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:56 IST

मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड

ठळक मुद्देपुढील अधिवेशन सोलापूर येथे होणारशिक्षणाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी मोहिम हाती घेणार

भूषण रामराजेनंदुरबार : मुख्याध्यापकाची भूमिका ही कुटूंबप्रमुखाची आहे़ त्यांच्यावर शिक्षणेतर कामांचा बोजा देऊन त्याची होणारी कोंडी रोखल्यास विद्यार्थी गुणवत्ता वाढीसह शिक्षकांचे प्रश्न हे मार्गी लागतील अशी भूमिका राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी मांडली़ पथराई ता़ नंदुरबार येथे ५८ व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनानिमित्त त्यांच्याशी केलेली ही बातचीत़प्रश्न :- मुख्याध्यापकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत़?उत्तर :- मुख्याध्यापक हा संस्थाचालक आणि शासन यांच्यातील दुवा आहे़ त्यांच्यावर अधिकच्या जबाबदाऱ्या दिल्यागेल्याने अडचणी येत आहेत़ शासनाने आज संच मान्यता देताना अनेक त्रुटी ठेवल्या आहेत़ आरटीई अ‍ॅक्टनुसार शिक्षण देण्याचा दावा शिक्षण विभागाकडून होत असला तरी विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या यात तफावत आहे़ अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष न देताच गुणवत्तावाढीची अपेक्षा शासन करत आहेत़ २० टक्के अनुदानित शाळांमध्ये काम करणारे असंख्य शिक्षक आज याच धोरणामुळे हालाखीच्या स्थितीत आहेत़ शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने मूल्यांकन योग्य पद्धतीने करावे, शिक्षकेतर कर्मचाºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासोबतच लेखनिक आणि शिपाई संवर्गातील पदांची भरती करण्याची परवानगी द्यावी़प्रश्न :- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी शासनाकडून काय अपेक्षित आहे़?उत्तर :- पवित्र पोर्टलमध्ये शिक्षकांना सामावून घेण्याच्या अटी आणि शर्ती शासनाने स्पष्ट केल्या पाहिजेत, पारदर्शकपणा हवा, जे शिक्षक पवित्र प्रणाली येण्याआधीपासून कार्यरत आहेत़ त्यांचा समावेश करण्यात यावा़ शासनाकडून शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे़ खाजगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांना बळ देणे, कंपन्यांकडून चालवल्या जाणाºया शाळांना सवलती देणे हे प्रकार शिक्षणाचे खाजगीकरण करण्याच्या दिशेचे पाऊल आहे़ यातून राज्यातील १ हजार ३०० शाळा बंद करण्यात आल्या़ ग्रामीण आणि शहरी भागात अनुदानित शाळांमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे पूर्वीही एक शिक्षक परंपरा होती़ ती कायम ठेवली तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढणार आहे़प्रश्न :- शिक्षण व्यवस्थेसाठी होत असलेला खर्च पुरेसा आहे का आणि शासनाकडून आपणास काय अपेक्षित आहे़?उत्तर :- राज्यात शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याचा दावा शासन करत असले तरी तो प्रत्यक्षात २़४७ टक्के आहे़ शाळा चालवणाºया संस्थांना योग्यवेळी अनुदान वितरण केले पाहिजे़ दिल्ली सरकारने शिक्षणाचा खर्च हा २४ टक्के केला आहे़ आपल्याकडे तशी स्थिती आल्यास विद्यार्थी गुणवत्ता वाढणार आहे़ अर्धवेळ शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे़ राज्यातील शालेय शिक्षण धोरण ठरवताना मुख्याध्यापक संघ महामंडळाचा एक प्रतिनिधी त्यात असला तर अनेक गोष्टींमध्ये आमुलाग्र बदल करता येतील़ येत्या वर्षात महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे़ या वर्षात मुख्याध्यापकांच्या अडचणींबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत, यात प्रामुख्याने अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना वगळण्यात यावे, वेतन आयोग लागू करणे, संच मान्यता आणि शिक्षणाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी मोहिम हाती घेणार आहे़पुढील अधिवेशन सोलापूर येथे होणारदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा बुधवारी समारोप करण्यात आला़ समारोपप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम़व्हीक़दम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, अधिवेशनाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ५९ वे राज्याधिवेशन सोलापूर येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली़ प्रसंगी सोलापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांना ध्वज प्रदान करण्यात आला़

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव